पुणे : पुण्यातील राजेश पाटील व्यवसायिक आहेत. राजेशचं वय 35 वर्ष झालंय तरीही अद्याप त्यांनी निवृत्तीचं नियोजन केलं नाही. निवृत्तीनंतर पेंशन मिळवण्यााठी त्यांच्या एका मित्रानं एनपीएस (NPS) मध्ये गुंतवणूक (investment) करण्याचा सल्ला दिला. राजेशनं ऑनलाईन गुंतवणूक सुरू करण्यास सुरुवात केली तर ऑटो आणि अॅक्टिव्ह (Active) असे दोन पर्याय समोर आले. मात्र,या दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय फायदेशीर आहे याची राजेशला माहिती नव्हती. राजेशप्रमाणेच बऱ्याच लोकांना NPS काय आहे? आणि त्याचं काम कसं चालतं? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय उपयोगी आहे? याची माहिती नसते. 2004 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएसची सुरुवात करण्यात आली. 2009 नंतर NPS योजना सर्वांसाठी खुली करण्यात आली. या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास वयाच्या 60 वर्षानंतर जमा झालेल्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम काढता येते. बाकीची रक्कम तुम्हाला दर महिन्याला पेन्शन च्या रुपात मिळते.