AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market:युद्धविरामाची घोषणा होताच पैशांचा पाऊस; शेअर बाजारात आनंदी आनंद गडे, गुंतवणूकदारांना फक्त छापले पैसे

Iran US Israel Ceasefire: इराण-इस्त्रायल आणि अमेरिकेत युद्ध विराम झाला. त्याची घोषणाही झाली. या युद्धाच्या सावटाखाली असलेल्या शेअर बाजाराला लागलीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या. दोन आठवड्यासाठी ही युद्धबंदी आहेत. त्यानंतर शेअर बाजार चमकला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये जवळपास 3.5 टक्क्यांची तेजी दिसली.

Share Market:युद्धविरामाची घोषणा होताच पैशांचा पाऊस; शेअर बाजारात आनंदी आनंद गडे, गुंतवणूकदारांना फक्त छापले पैसे
शेअर बाजार आनंदाच्या हिंदोळ्यावरImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 08, 2026 | 10:56 AM
Share

Sensex and Nifty 50 Big Boom: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात युद्ध विराम जाहीर केला. युद्ध बंदी जाहीर होताच जगभरातील शेअर बाजाराला आनंदाचे भरते आले आहे. भारतीय शेअर बाजारालाही आनंदाच्या उकळ्या फुटल्या. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना झटका बसला. पण आता सुगीचे दिवस आले आहेत. एका घोषणेने बाजाराचा मूड बदलला. बुधवारी आशियातील बाजारात 5 टक्क्यांची तेजी दिसली. तर आज सकाळी भारतीय शेअर बाजार चमकून उठला. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या रेघा हिरव्या रंगात न्हाऊन निघाल्या. दोन्ही निर्देशांक जवळपास 3.5 टक्क्यांनी धावला. अवघ्या काही मिनिटात गुंतवणूकदारांनी जवळपास 14 लाख कोटी रुपये छापले.

सेन्सेक्समध्ये मोठी तेजी

सकाळच्या सत्रात बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये जवळपास 2822 अंकांची तेजी दिसली. सेन्सेक्स 77,439 अंकावर ट्रेड करत होता. तर एनएसई निफ्टी 800 अंकांनी वधारला. निफ्टी 23,949 अंकावर ट्रेड करत होता. या काळात सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 कंपन्यांमध्ये तेजीचे सत्र दिसले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये 8.2 टक्के, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये 9 टक्के तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये 8.8 टक्क्यांची वाढ दिसली.

शेअर बाजारातील तेजीच्या सत्रात एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि सनफार्मा या कंपन्यांना मात्र सूर गवसला नाही. तर इंडिगोच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांची तेजी दिसली. मारुती, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स या शेअरमध्ये 6 टक्क्यांपेक्षा अधिकची तेजी दिसली. गुंतवणूकदारांची आज चांदी झाली.

ट्रम्प यांनी युद्धबंदी जाहीर केली. त्यामुळे आता दोन आठवडे मध्य-पूर्वेत मोठी शांतता राहील. याभागातून येणारा इंधन पुरवठा आता सहज होईल. तर दुसरीकडे इंधनाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जगात सुरु असलेले तेल संकट टळले आहे. त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी धूम दिसली.

आशियन बाजाराचा भांगडा

इराणवर दोन आठवडे कोणतेही हल्ले न करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला. त्यानंतर आशियाच्या बाजारात तेजीचे सत्र दिसले. आशिया बाजारात बंपर तेजी दिसली. जपानच्या निक्केई 225 टक्क्यांनी उसळला. निक्केई 56,230 अंकावर पोहला. टॉपिक्समध्ये 3 टक्क्यांची तेजी दिसली. हा निर्देशांक 3,775 अंकावर पोहचला. कोस्पीमध्ये 6 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसली. हँग सँग फ्यूचर इंडेक्समध्ये मोठी तेजी दिसली. तर जागतिक शेअर बाजारही या आनंदवार्तेच्या हिंदोळ्यावर असल्याचे चित्र आहे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?