गुंतवणुकीसाठी आणि करबचतीसाठी विमा खरेदी करणे योग्य आहे का ?

| Updated on: Jan 12, 2023 | 7:17 PM

आयकर कलम 80 c अंतर्गत तुम्हाला दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सवलत मिळते त्यामुळे अनेक जण आर्थिक वर्ष संपण्याआधी घाईगडबडीमध्ये विमा खरेदी करतात.

गुंतवणुकीसाठी आणि करबचतीसाठी विमा खरेदी करणे योग्य आहे का ?
Follow us on

मुंबई : विम्यामुळे कर वाचतो का ? हा प्रश्न तुम्हाला पडत असेलच. तर हो विम्यामुळे कर वाचतो. आयकर कलम 80 c अंतर्गत तुम्हाला दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सवलत मिळते त्यामुळे अनेक जण आर्थिक वर्ष संपण्याआधी घाईगडबडीमध्ये विमा खरेदी करतात. अनेक विमा एजंट बचतीच्या नावाखाली नवीन पॉलिसी विकण्यासाठी संपूर्ण वर्ष वाट पाहत असतात यासाठी ते आपल्या नातेवाईक आणि मित्रांना संपर्क करून अशी पॉलिसी विकत घेण्यास सांगतात. यामुळे विमा कंपण्याच्या व्यवहारात एप्रिलच्या तुलनेत डिसेंबरमध्ये पॉलिसी विक्रीचा आकडा दुप्पट वाढलेला दिसतो.

लाईफ इन्शुरन्स कौन्सिलच्या अहवालानुसार एप्रिल 2019 मध्ये आयुर्विमा कंपनीच्या नवीन व्यवहारातून मिळालेले उत्पन्न 9 लाख 982 हजार कोटी होते. हे उत्पन्न डिसेंबरमध्ये 25 हजार 79 कोटी इतके झाले.

2020 च्या एप्रिलमध्ये हा आकडा 6 हजार 728 कोटी इतका होता. हा आकडा या डिसेंबरमध्ये वाढून 24 हजार 383 कोटी इतका झाला.

याच प्रकारे एप्रिल 2021 मध्ये आयुर्विमा कंपन्यांच्या नवीन प्रीमियममधून 9 हजार 738 कोटी रुपये होती ते डिसेंबर महिन्यात अडीच पट वाढून आता 24 हजार 466 कोटी झाले आहे. याच दरम्याने नोकरदार आपल्या टॅक्सचे पूर्णतः प्लॅनिंग करत असतात.

कर वाचवण्याच्या नावाखाली अनेक लोकांना जबरदस्तीने विमा विकण्यात येत असेल तर काय करावे ? असे झाल्यास कर बचतीसाठी किती गुंतवणूक केली आहे ? तसेच वार्षिक बचत काय आणि किती आहे ? हे पहावे .

तसे पाहायला गेल्यास PF साठी 35 हजार रुपये. PPF मध्ये 20 हजार रुपयांची गुंतवणूक, 50 हजार रुपये वेगवेगळ्या विमा पॉलिसीचा हप्ता. गृहकर्जाच्या EMI मध्ये 50 हजार रुपये. म्हणजे एकूण मिळून 55 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे.

तसेच यामध्ये दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. म्हणजे  यांनी नवीन विमा खरेदी केला तरीही कर बचतीसाठी याचा कोणताही फायदा नाही. परंतु एजंटना विमा विक्रीतून कमिशन मात्र नक्की मिळते.

अनेक जण गुंतवणुकीसाठी आयुर्विम्यामध्ये गुंतवणूक करतात. विमा एजंटदेखील कागदपत्रांवर भल्यामोठ्या ऑफर असल्याचे सांगतात. परंतु आकडेवारी वेगळंच सांगते

तुम्हालादेखील तुमचा मित्र किंवा नातेवाईक पॉलिसी देत असेल तर भावनिक न होता विमा पॉलिसीची तुम्हाला खरंच गरज आहे का ? हे पहावे. विमा उत्पादनाबाबत सर्व माहिती घ्या .

तुम्हाला लाईफ कव्हर हवे आहे का ? विमा म्हणून तुम्हाला मनी बॅक पॉलिसी तर विकली जात नाहीये ना ? हे पाहावे.

विमा हे भविष्यातील तुमचे सुरक्षाकवच आहे. त्यामुळे विमा घेताना भविष्यात कोणतेही नुकसान सहन करावे लागणार नाही याची काळजी घ्यावी. बचत, गुंतवणूक किंवा कर बचतीसाठी विमा खरेदी करणे टाळावे.