AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Rate Today : सोन्याची घसरण थांबेचना, लगेच घ्या ज्वेलरकडे धाव… आज 10 ग्रॅमची किंमत पटापट घ्या जाणून

Gold Rate Today 4 June 2026 Latest News Updates in Marathi: पश्चिम आशियातील तणावामुळे प्रमुख व्याजदर दीर्घकाळ वाढलेले राहतील अशी भीती निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम मौल्यवान धातूंवर झाला आहे. देशांतर्गत बाजारातील सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो. आज सोन्याचे दर किती ?

Gold-Rate Today : सोन्याची घसरण थांबेचना, लगेच घ्या ज्वेलरकडे धाव... आज 10 ग्रॅमची किंमत पटापट घ्या जाणून
4 जून रोजी सोन्याचे दर किती ?
| Updated on: Jun 04, 2026 | 9:35 AM
Share

देशभरात सध्या सोन्याच्या दरात चांगलीच घसरण सुरूच आहे. गुरूवार, 4 जूनच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,56,630 रुपयांपर्यंत खाली घसरला. तर मुंबईत हाच भाव प्रति 10 ग्रॅम 1,56, 210 रुपये इतका आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या दरातील कमजोरी आणि अमेरिका-इराण शस्त्रसंधी कराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे भारतातही या मौल्यवान धातूच्या दरात घट झाली आहे. ग्राहकांसाठी ही एक खुशखबरच आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे प्रमुख व्याजदर दीर्घकाळ वाढलेले राहतील अशी भीती निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम मौल्यवान धातूंवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,463.84 डॉलर्स इतका आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची जून महिन्याची बैठक, काल म्हणजे 3 जून रोजी सुरू झाली. या बैठकीतले निर्ण, उद्या, 5 जून रोजी जाहीर केले जातील. दे शाचा रेपो दर सध्या 5.25 टक्के आहे, जो एप्रिलच्या बैठकीत बदलण्यात आला नव्हता. सध्या पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे महागाई आणि आर्थिक वाढीस निर्माण झालेली आव्हाने पाहता, मध्यवर्ती बँक या वेळीही रेपो दर 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवू शकते, अशी चर्चा आहे.

देशभरातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 143340 156360
मुंबई 143190 156210
अहमदाबाद 143240 156260
चेन्नई 144990 158170
कोलकाता 143190 156210
हैदराबाद 143190 156210
जयपुर 143340 156360
भोपाळ 143240 156260
लखनऊ 143340 156360
चंदीगड 143340 156360

दरम्यान एक दिवसापूर्वीच, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोन्याच्या विक्रीचे वृत्त फेटाळून लावले. प्रत्यक्ष सोन्याचा साठा 880.52 २ टन इतका स्थिर आहे, असं बँकेने सांगितलं. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या परिणामापासून आपल्या परकीय चलन साठ्याचे संरक्षण करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने अंदाजे 12 अब्ज डॉलर किमतीचे सोने विकल्याचे वृत्त होतं. आरबीआयने यावर स्पष्टीकरण जारी केलं. 22 मे 2026 पर्यंत भारताच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा 16.85 टक्के होता.

चांदीचे दर किती ?

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण सुरूच आहे. 4 जूनच्या सकाळी चांदीचा भाव 2,79,900 रुपये प्रति किलोग्राम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीचा भाव 74.43 डॉलर प्रति औंस होता. या वर्षी जानेवारीमध्ये चांदीच्या देशांतर्गत भावाने 4 लाख रुपये प्रति किलोग्रामचा टप्पा ओलांडला होता. मात्र आता चांदी 3 लाखांच्या खाली आहे.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ