AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC मध्ये पडून आहेत का तुमचे पैसे? आता घर बसल्या असं मिळवा परत

भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (LIC) खात्यात कोट्यवधी रुपये पडून आहेत, ज्याचा दावा कोणीही करत नसल्याचं समोर आलं आहे. पॉलिसीधारकांनी विसरलेल्या पॉलिसीचे हे पैसे पडून आहेत.

LIC मध्ये पडून आहेत का तुमचे पैसे? आता घर बसल्या असं मिळवा परत
पैसे परत मिळवण्यासाठी काही कालावधी ठरवलेला असतो. तो निघून गेला की, या रकमेवर तुम्हाला हक्क सांगता येत नाही. त्यामुळे जर तुमचेही पैसे एलआयसीमध्ये जमा असतील, तर ते वेळीच काढून घ्या.
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 1:37 PM
Share

मुंबई : LIC मध्ये खातं असणाऱ्यांसाठी ही महत्तावाची बातमी आहे. भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (LIC) खात्यात कोट्यवधी रुपये पडून आहेत, ज्याचा दावा कोणीही करत नसल्याचं समोर आलं आहे. पॉलिसीधारकांनी विसरलेल्या पॉलिसीचे हे पैसे पडून आहेत. पॉलिसी उघडल्यानंतर दोन-चार प्रीमियम भरताच खातेधारक पॉलिसी तशीच सोडून देतात. हे फक्त एलआयसीमध्येच नाही तर देशात अशा अनेक खासगी क्षेत्रातील कंपन्यामध्ये असंख्य खात्यांमध्ये पैसे असेच पडून आहेत. (lic news how unclaimed amount life insurance corporation policyholder can claim it)

खातेधारकांनी एलआयसीच्या खात्यात असलेली रक्कम डेथ क्लेम, मॅच्युरिटी क्लेम, सर्व्हायव्हल बेनिफिट्स, प्रीमियम परतावा किंवा नुकसान भरपाई क्लेमच्या रूपात जमा केलेली असते. पण अनेक खातेधारकांना याचा विसर पडला आहे. लक्षात असूद्या हे पैसे परत मिळण्यासाठी काही कालावधी ठरवलेला असतो. तो निघून गेला की या रक्कमेवर तुम्हाला हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे जर तुमचेही पैसे एलआयसीमध्ये जमा असतील तर ते वेळीच काढून घ्या. यासाठी एलआयसीने सोपा मार्ग ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. ही पद्धत ऑनलाइन आहे ज्यामध्ये एका क्लिकवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

कसे काढाल पैसै? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

एलआयसी खात्यामधून पैसे काढण्यासाठी आधी LIC च्या अधिकृत वेबसाईटवर जात. यानंतर https://licindia.in/Botom-Links/Ulala-Policy-Dues वर क्लिक करा. इथं क्लिक केल्यास एलआयसीचं एक पान उघडेल. यामध्ये पॉलिसीधारकांना खात्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर ‘Unclaimed and Outstanding amounts to Policyholders’ असं लिहिलेलं असतं.

तुमच्या खात्याविषयी माहिती मिळवण्यासाठी पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन कार्ड द्यावं लागणार आहे. विचारलेली माहिती रकानांमध्ये भरलेल्यानंतर सबमिट बटण क्लिक करा. यानंतर, तुम्हाला ठेवीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

– सगळ्यात आधी LIC च्या होम पेजवर जा

– होम पेजवर डाब्या बाजूला ‘सर्च’ टॅब असेल त्यामध्ये ‘लावारिस राशि’ टाईप करा

– त्यानंतर

या वेबसाईटवर क्लिक करा 

– यानंतर दिलेली संपूर्ण माहिती भरा

(lic news how unclaimed amount life insurance corporation policyholder can claim it)

संबंधित बातम्या – 

पोस्टाच्या ‘या’ 4 योजनांमध्ये गुंतवणूक करून लखपती व्हा, वाचा किती आहे व्याज

LIC Policy: दररोज अवघ्या 160 रुपयांच्या बचतीवर मिळणार 23 लाख; टॅक्स बेनिफिट्स आणि इतर अनेक फायदे

आता 5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बाद, पण त्याआधी वाचा ‘हा’ नियम

‘या’ 3 बँकांमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, RBI ने केली मोठी घोषणा

(lic news how unclaimed amount life insurance corporation policyholder can claim it)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.