पोस्टाच्या ‘या’ 4 योजनांमध्ये गुंतवणूक करून लखपती व्हा, वाचा किती आहे व्याज

सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता अनेक पोस्ट ऑफिस लहान बचत योजना (Post Office Small Savings) आणत आहेत ज्यात आपण गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षांतच लखपती होऊ शकता.

पोस्टाच्या 'या' 4 योजनांमध्ये गुंतवणूक करून लखपती व्हा, वाचा किती आहे व्याज
पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्किम
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 8:02 AM

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या काळात प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंता आहे. यामुळे अनेकजण गुंतवणुकीकडे वळले आहेत. जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) पैसे गुंतवण्याचा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला पैशांचीही काळजी करण्याचं कारण नाही. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता अनेक पोस्ट ऑफिस लहान बचत योजना (Post Office Small Savings) आणत आहेत ज्यात आपण गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षांतच लखपती होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या काही अशाच योजनांबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही 5 वर्ष ते 15 वर्षांपर्यंतच्या योजनेत बम्पर बेनिफिट मिळवू शकता. (post office small savings money making tips nsc recurring deposit kisan vikas patra know about PPF)

या योजनांमध्ये गुंतवा पैसे

पोस्ट ऑफिसमध्ये अशा काही योजना आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास बक्कळ पैसा कमावण्याची संधी आहे. या यादीमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), आवर्ती ठेव म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट (RD), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि टाईम डिपॉझिट (TD) योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदार काही वर्षांत मोठा फंड तयार करू शकतात.

कोणत्या योजनेवर किती आहे व्याज दर?

– Public Provident Fund: 7.1 टक्के

– Savings Deposit: 4 टक्के

– 1 Year time deposit: 5.5 टक्के

– 2 Year time deposit: 5.5 टक्के

– 3 Year time deposit: 5.5 टक्के

– 5 Year time deposit: 6.7 टक्के

– 5 Year Recurring Deposit: 5.8 टक्के

– 5 Year SCSS: 7.4 टक्के

– 5 Year MIS: 6.6 टक्के

– 5 Year NSC: 6.8 टक्के

किसान विकास पत्र

पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेमध्ये गुंतवणूकदारांना मॅच्युअरिटी कालावधीनंतर (Maturity Period) गुंतवणुकीची दुप्पट रक्कम मिळते. पण यासाठी किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. गुंतवणूकीच्या रकमेसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी आखण्यात आली आहे.

पोस्ट ऑफिस आरडी

बचतीसाठी पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचं स्वप्न सहजपणे पूर्ण करू शकता. या योजनेत पोस्ट ऑफिसमध्ये किमान पाच वर्षांसाठी आरडी खातं उघडलं जातं. यासाठी अनेक बँका सहा महिन्यांकरिता एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे इत्यादी आरडी खाते उघडण्याची सुविधा देतात.

राष्ट्रीय बचत योजना (NSC)

पोस्ट ऑफिसची पंचवार्षिक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना चालू तिमाहीत 6.8 टक्के परतावा देते. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 5 वर्षांचा लॉककिन कालावधी असतो. म्हणजेच तुम्ही 5 वर्ष होण्याआधी यामधून पैसे काढू शकत नाही.

सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana)

मुलींसाठी पोस्ट ऑफिसची सुकन्या योजना अतिशय उत्तम आहे. या योजनेत, कोणीही आपल्या मुलींसाठी खातं उघडू शकता. 21 वर्षांच्या मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. या योजनेत ही रक्कम 9 वर्ष 4 महिन्यांत दुप्पट होते. (post office small savings money making tips nsc recurring deposit kisan vikas patra know about PPF)

संबंधित बातम्या – 

Money Making Tips: करोडपती होण्याचा सोपा मार्ग, दिवसाला 30 रुपये गुंतवून व्हा मालामाल

आता 5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बाद, पण त्याआधी वाचा ‘हा’ नियम

‘या’ 3 बँकांमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, RBI ने केली मोठी घोषणा

(post office small savings money making tips nsc recurring deposit kisan vikas patra know about PPF)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.