
शेअर बाजारात घसरण सुरु आहे. त्यावेळी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअरने जबरदस्त कामिगिरी केली आहे. एलआयसीने मार्च 2025 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही आठवड्यात 38 % वाढ दर्शवली आहे. त्यानंतर एलआयसीच्या शेअरने रॉकेटप्रमाणे उड्डान घेतले आहे. बीएसईमध्ये एलआयसीचा शेअर बुधवारी 8.8% वाढत 948 रुपयांवर पोहचला. LIC च्या नफ्यात मागील तिमाही आठवड्याच्या तुलनेत आता वाढ झाली आहे. डिसेंबरच्या तिमाही आठवड्यात एलआयसीचा नफा 11,009 कोटी रुपये होता. आता त्यात 73% वाढ झाली आहे. एलआयसीचे बाजार भांडवल 45,000 कोटींनी वाढले आहे.
संपूर्ण आर्थिक वर्षात एलआयसीच्या नफ्यात 18% वाढ झाली आहे. कंपनीची संपत्ती आणि सॉल्वेंसी रेश्यो चांगला वाढला आहे. यामुळे कंपनीने गुंतवणूकदारांना 12 रुपये अंतिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला. एलआयसीचा नफा वाढला असला तरी प्रीमियमच्या उत्पन्नात घसरण झाली आहे. ही घसरण 3.2% आहे. कंपनीचे प्रीमियम 1,47,917 कोटी रुपये राहिले. मागील वर्षी ते 1,52,767 कोटी रुपये होते. परंतु मागील तीन महिन्यांचा विचार केल्यास त्यात 38% वाढ झाली आहे.
LIC चे Q4 चे निकाल आल्यानंतर वेगवेगळ्या ब्रोकरेज फर्मकडून सल्ला देण्यात आला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने 1,050 रुपयांचे टारगेट प्राइस निश्चित केले आहे. तसेच हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Antique फर्मनेही 990 रुपयांचे टारगेट प्राइसवर शेअर खरेदी करा, असे म्हटले आहे. Kotak Institutional Equities ने एलआयसीने शेअरची टारगेट प्राइस वाढवून 1,260 रुपये केली आहे.
एलआयसीने मंगळवारी शेअर बाजारास दिलेल्या माहिती म्हटले की, मार्च 2025 रोजी संपलेल्या चौथ्या आठवड्यात कंपनीचा नफा 38% वाढून 19,013 कोटी रुपयांवर गेला आहे. मागील वर्षीय याच तिमाहीमध्ये हा नफा 13,763 कोटी रुपये होता. कंपनीने खर्चात कपात करत प्रशासनात सुधारणा केली आहे. कंपनीचा नफा वाढला असला तरी उत्पन्नात घट झाली आहे. कंपनीचे उत्पन्न 2,41,625 कोटी रुपये आहे. मागील वर्षी हे उत्पन्न 2,50,923 कोटी रुपये होते. परंतु नफा वाढल्यामुळे गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरु झाली आहे.