Success Story : मजुरी सोडली चाटची गाडी टाकली, थेट 25 लाखाची कमाई

एकेकाळी मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करणारा एक मजूर आज लाखाेंची कमाई केली आहे. मजूरी सोडून त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याची सगळी स्वप्न पूर्ण झाली.

Success Story : मजुरी सोडली चाटची गाडी टाकली, थेट 25 लाखाची कमाई
success story
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 3:54 PM

मजुरी करून दिवस काढायचे, हातात येणाऱ्या रोजंदारीवरी घरखर्च भागवायचा आणि उद्याची चिंता करत जगायचं.. . अनेकांच्या आयुष्यात हेच रोजचं वास्तव असतं. पण याच परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एखाद्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि याच मेहनतीच्या जोरावर आपलं स्वप्न पुर्ण केलं, तर ती गोष्ट नक्कीच प्रेरणादायी ठरेल. मध्य प्रदेशातील अनिल सोनावणे यांची कहाणीही अशीच आहे. एकेकाळी मजुरी करणाऱ्या अनिल यांनी चाट आणि नमकिनचा छोटासा व्यवसाय सुरू केला. तब्बल 15 वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांच्या या व्यवसायातून 25 लाख रूपयांची कमाई झाली आणि स्वत: ची स्वप्न ही पूर्ण केले.

अनिल यांच्यासाठी हा प्रवास अजिहबात सोपा नव्हता. मजुरीच्या कामावर अवलंबून असताना मिळणाऱ्या मोठं स्वप्न पूर्ण करणं कठीण होतं. रोजच्या या मजूरीला कंटाळून,उद्या कसं जगायचं याची चिंता करून अनिल पार अस्वस्थ झाले होते. हाताला एक कायम आणि फिक्स कामाच्या शोधात होते. याच काळात त्यांच्या मित्राने त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यांना ती आयडिया पटली. त्यानंतर त्यांनी चाट आणि स्कॅनची गाडी लावून आपला छोटा व्यवसाय सुरू केला. सुरूवातीला मोठं दुकान किंवा भलीमोठी गुंतवणूक करण्याऐवजी त्यांनी चाट आणि नमकीनचा ठेला सुरू केला. हातात असलेल्या मर्यादित साधनांमधूनच त्यांनी व्यवसायाला सुरूवात केली.

Loading...

सुरूवातीला त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ग्राहतकांचा विश्वास जिंकणे आपला व्यवसाय वाढवणे सोपे नव्हते. अनिल यांनी आपल्या कामाला आणि चवीला प्राधान्या दिले. व्यवसाय छोटा असला तरी त्यांनी मेहनत आणि सातत्य सोडलं नाही. हळूहळू त्यांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. तब्बल 15 वर्ष हा व्यवसाय त्यांनी टिकवून ठेवला. या काळात त्यांनी जवळपास 25 लाख रूपये कमावले. आपल्या या पैश्यातून त्यांनी स्वत:ची स्वप्न पूर्ण केली. मुलांना उत्तम शिक्षण दिले. अनिल यांच शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे, त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळते. त्यामुळे त्यांच्या कमाईचा काही भाग ते मुलांचे शिक्षणासाठी दानही करतात.

आजकाल अनेकांना मोठा व्यवसाय सुरू करायचा असतो. त्यासाठी मोठं भांडवलं, मोठं दुकान आणि आधुनिक सुविधा हव्या असतात. पण अनिल सोनावणे यांचा प्रवास सांगतो की, व्यवसायाची सुरूवात नेहमी मोठीच असावी असं नाही. छोट्या ठेल्यापासूनही मेहनत, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता येते. मजुरी सोडून स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनिल यांनी ते प्रत्यक्षात उतरवून दाखवलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us