AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mira Rajput: आधी स्ट्रेच मार्क्स दाखवले नंतर..; शाहिद कपूरच्या पत्नीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Mira Rajput: अभिनेत्री मीरा राजपूतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या पोटावरील स्ट्रेच मार्क्स स्पष्ट दिसून येत आहेत. मात्र इन्स्टावर फोटो अपलोड करताना तिने ते एडिट केले.

Mira Rajput: आधी स्ट्रेच मार्क्स दाखवले नंतर..; शाहिद कपूरच्या पत्नीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Mira RajputImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 18, 2026 | 3:35 PM
Share

Mira Rajput: अभिनेता शाहिद कपूरची पत्नी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मीरा राजपूत सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सौंदर्य, फिटनेस आणि फॅशन यासाठी ओळखली जाणारी मीरा यावेळी तिच्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्समुळे चर्चेत आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या ‘द अर्थशॉट प्राइज अवॉर्ड्स 2026’ या सोहळ्यात मीरा रॉयल ब्लू रंगाच्या हटके ड्रेसमध्ये पोहोचली होती. विशेष म्हणजे, या ड्रेसमधून तिच्या पोटावरील स्ट्रेच मार्क्स स्पष्टपणे दिसत होते. तिने ते लपवण्याचा प्रयत्नही केला नाही. तिच्या या आत्मविश्वासाचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं. मात्र, त्यानंतर तिने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एडिटेड फोटोंमध्ये हे स्ट्रेच मार्क्स दिसत नसल्याचं नेटकऱ्यांनी लक्षात आणून दिलं. यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

17 नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘द अर्थशॉट प्राइज अवॉर्ड्स 2026’ या आंतरराष्ट्रीय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी मीरा राजपूतने रॉयल ब्लू रंगाचा आकर्षक कटआउट गाऊन परिधान केला होता. या ड्रेसची कमरजवळील कटआउट डिझाइन आणि त्याला जोडलेली लांब केप विशेष लक्षवेधी होती. शिमरी क्लच, मिनिमल ज्वेलरी, सटल मेकअप आणि मोकळे वेव्ही केस अशा लूकमध्ये मीरा एखाद्या फॅशन डीव्हाप्रमाणे दिसत होती. मात्र, तिच्या ड्रेसपेक्षा पोटावर दिसणाऱ्या स्ट्रेच मार्क्सचीच अधिक चर्चा झाली.

सामान्यतः सेलिब्रिटी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपल्या शरीरावरील डाग किंवा स्ट्रेच मार्क्स लपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मीराने कोणताही संकोच न बाळगता आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर पोझ दिले. तिच्या या अंदाजाचं महिलांनी विशेष कौतुक केलं. अनेकांनी तिच्या स्ट्रेच मार्क्सना ‘टायगर स्ट्राइप्स’ असं म्हटलं. मातृत्वानंतर शरीरात होणारे बदल लपवण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली. मीरा आणि शाहिद कपूर यांना मीशा आणि झैन अशी दोन मुलं आहेत.

पहा व्हिडीओ-

इन्स्टाग्रामवर एडिटेड फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप

मात्र, मीराने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर कार्यक्रमातील फोटो शेअर केल्यानंतर वेगळाच वाद सुरू झाला. पापाराझींनी काढलेल्या फोटोंमध्ये स्पष्ट दिसणारे स्ट्रेच मार्क्स तिच्या सोशल मीडिया फोटोंमध्ये कमी किंवा गायब असल्याचं नेटकऱ्यांनी निदर्शनास आणलं. यामुळे काही चाहत्यांनी तिला दुटप्पीपणाचा आरोप करत ट्रोल केलं. एका युजरने म्हटलं की, सुरुवातीला एका सेलिब्रिटीने नैसर्गिक शरीर स्वीकारण्याचा संदेश दिल्याचं वाटलं; मात्र एडिटेड फोटो पाहून निराशा झाली. आणखी एका युजरने महिलांना प्रेरणा देण्याची संधी मीराने गमावल्याची प्रतिक्रिया दिली.

पहा फोटो-

दुसरीकडे, काही चाहत्यांनी मीराला पाठिंबा दिला आहे. स्वतःचे फोटो कसे शेअर करायचे, ते एडिट करायचे की नाही, हा तिचा वैयक्तिक निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलं. सध्या या प्रकरणावरून सोशल मीडियावर बॉडी पॉझिटिव्हिटी, सेलिब्रिटींचे फोटो एडिटिंग आणि नैसर्गिक सौंदर्य यावर चर्चा सुरू आहे. मीराने मात्र या टीकेवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Follow Us
शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या
Shivsena Hearing Case : शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हिपच्या वैधतेवर उपस्थित केले प्रश्न
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसी.....
Shivsena UBT : बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसींविरोधात मुंबई महापालिकेत जोरदार आंदोलन
हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; वडेट्टीवारांचं शिंदे
Vijay Wadettiwar : हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; विजय वडेट्टीवारांचं शिंदे सेनेला थेट आव्हान
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संतापल्या
Sushma Andhare : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... शायना एनसी यांच्यावर सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या
Supriya Sule : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या मदतीची मागणी!
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून...
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून दिले महत्त्वाचे संकेत!