AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्ड क्रीम, मॉइश्चरायझर की बॉडी लोशन? हिवाळ्यात त्वचेसाठी नेमके काय वापरावे? जाणून घ्या फरक

हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. अशावेळी त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी कोल्ड क्रीम, मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशन यांचा वापर केला जातो. मात्र, या तिन्ही उत्पादनांमध्ये नेमका काय फरक आहे आणि त्वचेच्या प्रकारानुसार कोणते उत्पादन वापरावे, हे जाणून घेऊया.

कोल्ड क्रीम, मॉइश्चरायझर की बॉडी लोशन? हिवाळ्यात त्वचेसाठी नेमके काय वापरावे? जाणून घ्या फरक
Moisturizer
| Edited By: | Updated on: Nov 18, 2026 | 3:28 PM
Share

हिवाळा सुरू होताच थंड वाऱ्यांमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ लागते. अशावेळी त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी अनेक जण कोल्ड क्रीम, मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशनचा वापर करतात. मात्र, ही तिन्ही उत्पादने सारखीच आहेत असे समजणे चुकीचे आहे. या प्रत्येक उत्पादनाची रचना आणि वापरण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे त्वचेच्या गरजेनुसार योग्य उत्पादन निवडणे महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया या तिन्ही उत्पादनांमधील फरक.

मॉइश्चरायझर म्हणजे काय?

मॉइश्चरायझर हे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करणारे उत्पादन आहे. हे क्रीम आणि लोशन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असते. सामान्य, तेलकट, कोरडी आणि संवेदनशील अशा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर मिळते. तेलकट त्वचेसाठी जेल किंवा वॉटर बेस्ड, तर कोरड्या त्वचेसाठी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरता येते. अंघोळीनंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर त्वचा थोडी ओलसर असताना ते लावणे फायदेशीर ठरते.

बॉडी लोशन म्हणजे काय?

बॉडी लोशन हे प्रामुख्याने शरीराच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरले जाते. यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते हलके असते आणि त्वचेमध्ये सहज शोषले जाते. हात, पाय, पाठ आणि शरीराच्या इतर भागांवरील कोरडेपणा कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. अंघोळीनंतर बॉडी लोशन लावल्याने त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

कोल्ड क्रीम म्हणजे काय?

कोल्ड क्रीम हे ऑइल बेस्ड स्किन केअर प्रोडक्ट आहे. यामध्ये तेल किंवा मेणाचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा पोत घट्ट असतो. चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर संरक्षक थर तयार होतो आणि ओलावा टिकून राहण्यास मदत होते. अतिशय कोरड्या आणि निस्तेज त्वचेसाठी हे उपयुक्त ठरते. मात्र, तेलकट त्वचा असणाऱ्यांना यामुळे मुरुमांचा त्रास होऊ शकतो.

त्वचेसाठी योग्य उत्पादन कसे निवडावे?

कोरड्या त्वचेसाठी लोशनच्या तुलनेत क्रीम किंवा मलम अधिक प्रभावी ठरू शकतात. मात्र, प्रत्येक उत्पादन प्रत्येकाच्या त्वचेला सूट होईलच असे नाही. त्यामुळे त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन उत्पादन निवडावे. नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. त्वचेवर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास त्याचा वापर थांबवावा.

Follow Us
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसी.....
Shivsena UBT : बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसींविरोधात मुंबई महापालिकेत जोरदार आंदोलन
हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; वडेट्टीवारांचं शिंदे
Vijay Wadettiwar : हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; विजय वडेट्टीवारांचं शिंदे सेनेला थेट आव्हान
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संतापल्या
Sushma Andhare : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... शायना एनसी यांच्यावर सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या
Supriya Sule : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या मदतीची मागणी!
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून...
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून दिले महत्त्वाचे संकेत!
प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; कुटुंबियांचा लढा कायम, आता...
Pradip Purnekar Case : प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; पुर्णेकर कुटुंबियांचा लढा कायम, आता थेट...