AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold and Silver Price Crash : गोल्डन चान्स… 11 महिन्यात सोनं 60 हजाराने स्वस्त, ज्याची भीती होती, आता तेच घडणार…

गेल्या 11 महिन्यांत सोन्याचे भाव 60,000 रुपये तर चांदीचे भाव 2.57 लाख रुपयांनी स्वस्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे, विशेषतः फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीच्या शक्यतेमुळे हे दर कोसळले आहेत. ही गुंतवणूकदारांसाठी खरेदीची सुवर्णसंधी आहे, कारण भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे. आजच करा सोन्यात गुंतवणूक.

Gold and Silver Price Crash : गोल्डन चान्स... 11 महिन्यात सोनं 60 हजाराने स्वस्त, ज्याची भीती होती, आता तेच घडणार...
Gold and Silver Price CrashImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 3:47 PM
Share

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीचे भाव वेगाने कोसळत आहेत. गेल्या 11 महिन्यात सोन्याचे भाव सुमारे 60 हजार रुपयांनी कोसळले आहेत. म्हणजे या 11 महिन्यात सोनं 60 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. सोनं अजून स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी असल्यांच मानलं जात आहे. एमसीएक्सवर आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 3200 रुपयांनी म्हणजेच 2.38 टक्क्यांनी घसरून 131027 रुपयांवर आला आहे. चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण झाली आहे.

चांदीच्या किंमत आज 5900 रुपये वा 3.47 टक्क्याने घसरून 1,63,818 रुपये प्रति किलोवर आली आहे. फेड रेटशी संबंधित विधान आल्याने सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. फेडरल रिझर्व्ह बँक डिसेंबरच्या मिटिंगमध्ये व्याज दर वाढवण्याची शक्यता आहे. तसेच त्यानंतर अनेकवेळा व्याजदरात वाढ होणार असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. असं झालं तर महागाई वाढणार आहे. बॉन्ड मार्केटमध्ये तेजी येणार आहे. व्याज दर वाढतील. त्यामुळे सोन्या चांदीच्या सेफ असेटमध्ये मोठी घसरण होईल आणि पुढेही होत राहणार आहे.

दुसरीकडे आज फेडकडून आणखी काही अपडेट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सराफा बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सराफा बाजारात दिल्लीपासून मुंबईपर्यंत सोन्या आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

24 कॅरेट सोन्याचे भाव

IBJAच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 3000 रुपयांनी कमी होऊन 131505 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याचे भाव सुमारे 2900 रुपयांनी घटून 120459 रुपयांवर आले आहेत. 18 कॅरेट सोन्याची किंमत 98629 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे चांदीची किंमत 4400 रुपये घटून 164506 रुपये प्रति किलो झाली आहे.

60 हजार रुपयाने सोने स्वस्त

सोने आणि चांदीची किंमत रेकॉर्ड हायवरून खूप खाली आली आहे. जानेवारीत सोने 1.93 लाखावर आले होते. आता सोने 1.31 लाखावर आले आहे. म्हणजे गेल्या 11 महिन्यात 62 हजाराने सोने स्वस्त झालं आहे. याचप्रमाणे चांदीचा रेकॉर्ड हाय लेव्हल 4.20 लाख रुपये आहे आणि आता 1.63 लाखावर आहे. म्हणजे या 11 महिन्यात चांदीही 2.57 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.

आंतरराष्ट्रीय मार्केट काय म्हणतंय?

ग्लोबल मार्केटमध्ये सोनं 2.15 टक्क्याने घसरून 3,780.40 डॉलर प्रति औंसवर आलं आहे. तर चांदी 3.15 टक्क्याने घसरून 45.865 डॉलर प्रति औंस आली आहे.

Follow Us
शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या
Shivsena Hearing Case : शिवसेना सत्तासंघर्षात ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हिपच्या वैधतेवर उपस्थित केले प्रश्न
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात
बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसी.....
Shivsena UBT : बाळासाहेबांच्या फोटोच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक; शायना एनसींविरोधात मुंबई महापालिकेत जोरदार आंदोलन
हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; वडेट्टीवारांचं शिंदे
Vijay Wadettiwar : हिंमत असेल तर फडणवीसांचे सरकारी GR फाडून दाखवा; विजय वडेट्टीवारांचं शिंदे सेनेला थेट आव्हान
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... सुषमा अंधारे संतापल्या
Sushma Andhare : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भानही त्यांना... शायना एनसी यांच्यावर सुषमा अंधारे संतापल्या
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या
Supriya Sule : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या मदतीची मागणी!
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून...
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून दिले महत्त्वाचे संकेत!