आठवड्यात डबल होऊ शकतो पैसा! उद्या उघडणार MTAR टेक्नॉलॉजीचा IPO, वाचा सविस्तर

| Updated on: Mar 02, 2021 | 10:03 AM

गेल्या दोन महिन्यांत 8 कंपन्यांचे आयपीओ सुरू झाले आहेत. उद्या मार्च महिन्यातला पहिला आयपीओ सुरू होणार आहे.

आठवड्यात डबल होऊ शकतो पैसा! उद्या उघडणार MTAR टेक्नॉलॉजीचा IPO, वाचा सविस्तर
Follow us on

मुंबई : वर्ष – 2021 मध्ये आयपीओमधून मोठी कमाई होणार आहे. खरंतर, गेल्या दोन महिन्यांत 8 कंपन्यांचे आयपीओ सुरू झाले आहेत. उद्या मार्च महिन्यातला पहिला आयपीओ सुरू होणार आहे. एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा (MTAR Technologies)आयपीओ 3 मार्च रोजी उघडेल आणि 5 मार्च रोजी बंद होईल. त्यामुळे यामध्ये गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. (make money mtar technologies ipo will open on march 3 grey market premium soars)

मीडिया रिपोर्टनुसार, 10 ते 16 कंपन्या मार्च महिन्यात आयपीओ सुरू करू शकतात. . गेल्या काही वर्षांत काही आयपीओ वगळता इतर सर्व गोष्टींमध्ये गुंतवणूकदारांनी पैसे कमावले. सगळ्यात महत्त्वाचं गेल्या वर्षी आयपीओमधून बक्कळ परतावा आला.

यामुळे गुंतवणूकदार आता MTAR टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची प्रतीक्षा करत आहेत. हैदराबादस्थित टेक कंपनी आयपीओद्वारे 596 कोटी रुपये जमा करणार आहे. कंपनीने आयपीओची किंमत बँड 574-575 रुपये निश्चित केली आहे. यामुळे गुंतवणूकदारास किमान 26 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. म्हणजेच 26 शेअर्सचा लॉट साईज आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, MTAR Technologies ची मोठी यादी जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आयपीओ ग्रे मार्केटवर बम्पर प्रीमियम मिळत आहे. ग्रे मार्केटमध्ये एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा आयपीओ 75 टक्के प्रीमियमवर व्यापार करत आहे. म्हणजेच ग्रे मार्केटमधील अनलिस्टेड शेअर्स इश्यूच्या किंमतीपेक्षा 430 रुपयांच्या वर 1005 रुपयांवर व्यापार करत आहेत.

खरंतर, आत्मनिर्भर भारतासाठी ज्या पद्धतीने देशात पावलं उचलली जात आहेत, त्याचा फायदा एमटीएआर टेक्नॉलॉजीजसारख्या कंपन्यांना होईल. (make money mtar technologies ipo will open on march 3 grey market premium soars)

(टीप – कुठल्याही IPO किंवा योजनेमध्ये गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. )

संबंधित बातम्या – 

‘या’ बँकांमध्ये करा एक वर्षासाठी FD, व्याजदरही कमी आणि जबरदस्त फायदे

Petrol Diesel Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी काय आहे पेट्रोलचा भाव? वाचा तुमच्या शहरातले दर

Gold Prices Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव घसरले, चांदी वधारली; वाचे ताजे भाव

घरी बसल्या दिवसाला करू शकता बक्कळ कमाई, तुमच्यासाठी खास 8 बिझनेस आयडिया

(make money mtar technologies ipo will open on march 3 grey market premium soars)