AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SIP : पैशांवर छापा पैसा! हा म्युच्युअल फंड करुन देईल मोठी कमाई

Mutual Fund SIP : शेअर बाजारातील गणितं समजत नसतील आणि एफडीपेक्षा अधिक कमाई करायची असेल तर मग या गोष्टी तुमच्या उपयोगाच्या ठरू शकतील. ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल.

SIP : पैशांवर छापा पैसा! हा म्युच्युअल फंड करुन देईल मोठी कमाई
| Updated on: Sep 25, 2025 | 4:36 PM
Share

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP) सध्याच्या काळातील सर्वात लोकप्रिय कमाईचे साधन आहे. छोटी छोटी रक्कम प्रदीर्घ काळासाठी गुंतवल्यास त्याचा फायदा दिसून येतो. पण चांगला परतावा मिळवण्यासाठी केवळ एसआयपी सुरु करणे पुरेसे नाही. त्यासाठी नियोजन आणि योग्य फंड्सची निवड गरजेची आहे. म्युच्युअल फंड निवडताना योग्य काळजी घेतल्यास, समीक्षा केल्यास त्याचे फायदे पण दिसून येतात.

असा निवडा फंड

  • कमी जोखीम : जर कमी जोखीम असलेला फंड हवा असेल तर debt funds वा balanced funds चा पर्याय निवडा
  • मध्यम जोखीम : यामध्ये चढउतार असला तरी धोका कमी असतो. यामध्ये hybrid वा large-cap funds निवडता येईल.
  • मोठी जोखीम : जर तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणार असाल आणि अधिक परतावा हवा असेल तर मग mid-cap अथवा small-cap funds हा चांगला पर्याय आहे.

किती वर्षांसाठी करणार गुंतवणूक?

  1. 3-5 वर्ष : Balanced Advantage वा Large Cap Funds
  2. 5-7 वर्ष : Large & Mid Cap / Flexi Cap Funds
  3. 7+ वर्ष : Mid Cap / Small Cap Funds

SIP रक्कम किती असावी?

  • तुमच्या मिळकतीनुसार आणि बचतीच्या सवयीनुसार एसआयपी ठरवात येईल
  • 5000,10,000 रुपयांची एसआयपी हवी अशी काही गरज नाही
  • SIP Calculator च्या मदतीने तुमच्या गरजांची सांगड घाला
  • किती रक्कम, किती कालावधीसाठी गुंतवली त फायदेशीर राहील त्याचा अंदाज घ्या.

याकडे दुर्लक्ष नको

जेव्हा तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा गुंतवणूक कराल तेव्हा 3 ते 5 वेगवेगळ्या श्रेणीचे फंड्स निवडा. त्यात एसआयपी करा. कारण असं विविधीकरण गरजेचं आहे. वेळोवेळी वर्षातून एकदा तरी तुमच्या पोर्टफोलियोची समीक्षा जरुर करा. एसआयपी गुंतवणुकीत संयम ठेवणे फार गरजेचे आहे. येथे पैसा वाढतो. पण त्यासाठी नियमीत गुंतवणूक करणे आणि प्रतिक्षा करणे गरजेचे ठरते. एसआयपीची जादू 10 वर्षांनी दिसू लागते.

गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही विविध म्युच्युअल फंडचा अभ्यास करा. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक समजून घ्या. या क्षेत्रातील तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्या. त्यानंतर तुमचा निर्णय पक्का करा. एसआयपी सुरु केल्यावर ती मध्यंतरीच बंद करू नका. नियमीत बचत हीच तुमच्या खऱ्या कमाईची किल्ली, चाबी ठरेल. हा झटपट श्रीमंतीचा मार्ग नाही हे अगोदर मनाशी पक्क करा.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.