
चित्रपटसृष्टीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. सुरूवातीला ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यावर फिल्म इंडस्ट्रीने मजबूत पैसा छापला. मात्र दिवस फिरलेत, आधी ओटीटी कंपन्या चित्रपटांसाठी कोटी रूपये देत त्याचे हक्क विकत घेत होते. आता ओटीटी कंपन्यांकडे चित्रपट घेऊन जावं लागत आहे. सिनेमा हॉलमध्ये जाण्यापेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहण्याचा प्रेक्षकांचा कल वाढलाय. हा बदल कसा झाला आणि प्रेक्षकवर्ग ओटीटी प्लॅटफॉर्मकडे का आकर्षित होतोय जाणून घ्या. ओटीटी म्हणजे काय? ओटीटी म्हणजे Over the Top, बाजारात असे आता अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. यावर सिनेमा, वेब सीरीज आणि मालिका आपण पाहू शकतो. तुम्हाला प्रत्येक कॅटेगिरीमधील चित्रपट आणि वेब सीरीज असतात. काही OTT प्लॅटफॉर्म मोफत तर काहींचा प्रीमियम भरावा लागतो. भारतात ओटीटी कंपनी कधीपासून वाढल्या? या ओटीटी कंपन्यांचा व्यवसाय चालतो तरी कसा? याविषयीची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. ...