पतंजलीचा आयपीओ लवकरच आणणार, आता रुची सोयाचा FPO येणार

| Updated on: Jul 13, 2021 | 9:53 PM

पतंजलीच्या वाढत्या व्यवसायाबद्दल बाबा रामदेव म्हणाले की आम्ही 2025 पर्यंत HUL मागे सोडण्याच्या योजनेवर काम करीत आहोत.

पतंजलीचा आयपीओ लवकरच आणणार, आता रुची सोयाचा FPO येणार
रामदेव बाबाच्या कंपनीने केली ही कमाल, गुंतवणूकदारांना मिळवून दिला 1000 कोटींचा नफा
Follow us on

नवी दिल्ली : बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडने (Patanjali Ayurved Limited) आपली सहकारी कंपनी रुची सोयाचा एफपीओ (Ruchi Soya FPO) जाहीर केलाय. इतकेच नव्हे तर पतंजली एफएमसीजी क्षेत्रातील हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) सारख्या कंपन्यांनाही हरवण्याची तयारी करीत आहे. कंपनीच्या योजनांवर बाबा रामदेव म्हणाले की, आम्ही एचयूएल वगळता सर्व कंपन्यांना मागे सोडलं आहे. सध्या एचयूएल ही आमच्यापेक्षा मोठी कंपनी आहे. पतंजलीच्या वाढत्या व्यवसायाबद्दल बाबा रामदेव म्हणाले की आम्ही 2025 पर्यंत HUL मागे सोडण्याच्या योजनेवर काम करीत आहोत. (Patanjali’s IPO will come soon, now Ruchi Soya FPO will come)

पतंजली 5 वर्षांत 5 लाख लोकांना रोजगार देणार

बाबा रामदेव म्हणाले की, पतंजलीने 5 वर्षांत 5 लाखांहून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. येत्या 5 वर्षांत 5 लाख नवीन रोजगार देणार आहे. ते म्हणाले की, 2 जणांच्या मदतीनं सुरुवात केल्यानंतर 200 देशांमध्ये योगासने पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आम्ही 100 पेक्षा जास्त संशोधन आधारित औषधे तयार केलीत. एवढेच नाही तर आम्ही रुची सोयाचा व्यवसाय वाढवून 16,318 कोटी रुपये केलाय. आम्ही रुची सोयाला 24.4 टक्के दराने पुढे आणलेय. पुढे कंपनीचे संपूर्ण संशोधन, आरोग्य, शिक्षण आणि शेतीवर असेल. वर्ष 2020-21 या आर्थिक वर्षात पतंजलीची उलाढाल सुमारे 30,000 कोटी रुपये होती.

रुची सोया 4300 कोटींचा एफपीओ आणेल

बाबा रामदेव पुढे म्हणाले की, पतंजलीच्या क्षमतेचा अविरत विस्तार सुरू आहे. आता आम्ही पौष्टिक उत्पादनांवर लक्ष केंद्रित करीत आहोत. महिलांच्या आरोग्य सेवांवरही आता जोर दिला जात आहे. ते पुढे म्हणाले की, आम्ही रुची सोयाला एफएमसीजी कंपनी बनवू. आम्ही रुची सोया यांसारख्या कंपनीकडे वळलो आहोत. आम्ही 4,300 कोटी रुपयांचा एफपीओ घेऊन येत आहोत. या दरम्यान आम्ही पतंजलीच्या आयपीओची बातमी लवकरच आपल्याला देणार असल्याचे सांगितले. बाबा रामदेव म्हणाले की, पतंजली समूहाचे पुढील तीन-चार वर्षांत कंपन्यांना कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.

संबंधित बातम्या

स्वामित्व योजनेसंदर्भात सरकार अॅक्शन मोडमध्ये, फायदा कोणाला अन् कसा होणार?

तुम्हाला SBI आणि HDFC Bank पेक्षा जास्त परतावा हवाय, ‘या’ बँकांमध्ये एफडी करा, 7 टक्के व्याज फिक्स्ड

Patanjali’s IPO will come soon, now Ruchi Soya’s FPO will come