AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today | पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.(Petrol Diesel Price Today Update)

Petrol Diesel Rate Today | पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?
| Updated on: Mar 13, 2021 | 11:23 AM
Share

मुंबई : देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. विशेष म्हणजे सलग 13 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.  (Petrol Diesel Price Today Update)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.63 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.33 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.25 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.77 ₹ 87.45
2 अकोला ₹ 97.45 ₹ 87.16
3 अमरावती ₹ 98.82 ₹ 88.48
4 औरंगाबाद ₹ 98.24 ₹ 87.90
5 भंडारा ₹ 98.27 ₹ 87.95
6 बीड ₹ 98.88 ₹ 88.53
7 बुलडाणा ₹ 98.28 ₹ 87.96
8 चंद्रपूर ₹ 97.49 ₹ 87.21
9 धुळे ₹ 97.45 ₹ 87.14
10 गडचिरोली ₹ 98.60 ₹ 88.27
11 गोंदिया ₹ 98.86 ₹ 88.52
12 मुंबई उपनगर ₹ 97.62 ₹ 88.64
13 हिंगोली ₹ 98.26 ₹ 87.95
14 जळगाव ₹ 98.61 ₹ 88.25
15 जालना ₹ 98.93 ₹ 88.56
16 कोल्हापूर ₹ 98.04 ₹ 87.73
17 लातूर ₹ 98.90 ₹ 88.55
18 मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
19 नागपूर ₹ 97.39 ₹ 87.11
20 नांदेड ₹ 99.63 ₹ 89.25
21 नंदूरबार ₹ 98.31 ₹ 87.98
22 नाशिक ₹ 97.90 ₹ 87.54
23 उस्मानाबाद ₹ 98.05 ₹ 87.73
24 पालघर ₹ 97.35 ₹ 87.01
25 परभणी ₹ 99.33 ₹ 88.94
26 पुणे ₹ 97.37 ₹ 87.06
27 रायगड ₹ 97.38 ₹ 87.04
28 रत्नागिरी ₹ 98.88 ₹ 88.51
29 सांगली ₹ 97.48 ₹ 87.19
30 सातारा ₹ 98.26 ₹ 87.90
31 सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
32 सोलापूर ₹ 98.10 ₹ 87.78
33 ठाणे ₹ 97.09 ₹ 86.76
34 वर्धा ₹ 97.87 ₹ 87.57
35 वाशिम ₹ 98.05 ₹ 87.74
36 यवतमाळ ₹ 98.87 ₹ 88.53

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) :  91.17 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 97.57 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 91.35 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) :  93.11 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 89.38 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) :  86.45 रुपये प्रतिलीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलीटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today Update)

संबंधित बातम्या : 

EPFO खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी; मोठा नियम झाला सोपा; झंझटीशिवाय काढा पैसे

10 हजारांच्या दंडापासून वाचायचंय, तर पॅन कार्ड अपडेट करा; 31 मार्च ही शेवटची संधी

Follow Us
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण