‘आधार’वरुन अवघ्या तीन दिवसात पीएफ काढणं शक्य!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

नवी दिल्ली: नोकरदारांची हक्काची बचत म्हणजे भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडंट फंड खूप महत्त्वाचा असतो. ईपीए हा नोकरदारांना निवृत्तीनंतरचं आयुष्य आरामात घालवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. मात्र पीएफमधील रक्कम काढणं हे यापूर्वी अत्यंत कठीण काम होतं, आता ते सुलभ करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) प्रोव्हिडंट फंड (पीएफ) काढण्याची प्रक्रिया सोपी केली […]

आधारवरुन अवघ्या तीन दिवसात पीएफ काढणं शक्य!
Follow us on

नवी दिल्ली: नोकरदारांची हक्काची बचत म्हणजे भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडंट फंड खूप महत्त्वाचा असतो. ईपीए हा नोकरदारांना निवृत्तीनंतरचं आयुष्य आरामात घालवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. मात्र पीएफमधील रक्कम काढणं हे यापूर्वी अत्यंत कठीण काम होतं, आता ते सुलभ करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) प्रोव्हिडंट फंड (पीएफ) काढण्याची प्रक्रिया सोपी केली आहे.

आता ऑनलाईन पद्घतीने पीएफ काढता येतो. त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड EPFO ला लिंक करणं आवश्यक आहे. ते लिंक केल्यानंतर 3-4 दिवसांत पीएफचे पैसे काढता येतील. मात्र, त्यासाठी तुमच्या पीएफ अकाऊंटचे KYC (Know Your Customer) करणं महत्त्वाचं आहे. पीएफचे पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी किंवा काढण्यासाठी Withdrawal Claim प्रोसेस करणं गरजेचं आहे.

काय आहे महत्त्वाचे ?

EPFO च्या अकाऊंटधारकांना एक युनिवर्सल अकाऊंट नंबर दिला जातो. एकदा हा नंबर जनरेट झाल्यानंतर तुम्ही नोकरी बदलल्यानंतरही तो नंबर बंद होत नाही. त्यामुळे नोकरी सोडल्यानंतरही पीएफ अकाऊंटचे पैसे न काढता तो पीएफ नंबर सुरू ठेवता येतो.

  •  तुमचा आधार नंबर EPFO शी संलग्न असावा.
  • बँक अकाऊंटची माहिती यूएएनमध्ये असणं महत्त्वाचं आहे.
  • तसेच पीएफ अकाऊंटधारकाचा पॅन नंबर EPFO कडे नोंद करायला हवा.

अप्लाय कुठे करायचं?

EPFO च्या अकाऊंट धारकांनी ई-सेवा पोर्टल https:unifiedportal-mem.epfindia.gov.in वर लॉग इन करा.

कशी आहे प्रक्रिया?

लॉग इन केल्यानंतर आधार क्लेम सबमिशन टॅब सिलेक्ट करा. त्यानंतर अकाऊंट धारकाने KYC व्हेरिफिकेशन करावी लागते. क्लेम विथड्रॉल करण्यासाठी विविध प्रक्रिया पार पाडाव्या लागतात.

प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

प्रक्रिया करत असताना EPFO कडून UDAI डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड असलेल्या मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड पाठवला जातो. तो OTP टाकल्यानंतर क्लेम फॉर्म सबमिट होतो. त्यानंतर विथड्रॉल प्रक्रिया सुरु होते. क्लेम प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पीएफ अकाऊंट धारकाचे रजिस्टर्ड बँक अकाऊंट कनेक्ट होते.

ही काळजी घ्या?

EPFO धारकाला या सुविधेचा वापर करण्यासाठी आपल्या कंपनीकडे जाण्याची गरज नाही. मात्र त्यासाठी EPFO धारकाकडे कंपनीचा इस्टॅब्लिशमेंट नंबर असणं आवश्यक आहे. तसेच आधार डेटाबेसमध्ये आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि EPFO मध्ये दिलेला मोबाईल नंबर सारखा पाहिजे. त्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत आधार नंबरवरुन पीएफचे पैसे काढता येतील.