वडिलांना हाकलले, पत्नीशी भांडला, देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या महागडे घराचा मालक, कोण आहे हा उद्योजक
JK House : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटालियाविषयी जवळपास सर्वांनाच माहिती आहे. हे भारताचे सर्वात आलिशान आणि महागडे घर आहे. जगातील महागड्या घरात पण त्याची गणती होते. पण तुम्हाला माहिती आहे का, की त्याच्या जवळच देशातील दुसरे सर्वात महागडे घर आहे ते?
भारतातील सर्वात महागड्या घराची चर्चा निघाल्यावर, सर्वात अगोदर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाचा क्रमांका पहिला येतो. अंबानी यांचे हे घर खरोखरच महागडे आणि आलिशान आहे. जगातील महागड्या घरांपैकी ते एक आहे. पण त्याला अगदी जवळच देशातील अजून एक महागडे घर आहे, ते तुम्हाला माहिती आहे का? तर त्याच्या मालकाच्या कुटुंबातील कलह तुमच्या वाचनात आले असतील. वडिलांना त्याने घराबाहेर काढले तर पत्नीशी सुद्धा गेल्या दिवाळीपासून वाद सुरु आहे. सुखी संसारच्या 32 वर्षानंतर हा उद्योजक पत्नीला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे…
देशातील सर्वात महागडे घर
मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे देशातील सर्वात महागडे घर आहे. एल्टामाऊंट रोडवर ते दिमाखात उभे आहे. या रस्त्याला भारताचे Billionaire’s Row पण म्हटल्या जाते. याच रस्त्यावर देशातील दुसरे सर्वात महागडे घर ‘जे.के. हाऊस’ आहे. ही इमारत अँटिलियापेक्षा पण मोठी आहे.
काय आहे खास जे.के. हाऊसमध्ये
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया ही 27 मजल्याची इमारत आहे. तर जे. के. हाऊसमध्ये 36 मजले आहेत. या इमारतीची रचना जवळपास अँटिलियासारखीच आहे. या मालमत्तेचे नुतनीकरण करण्यात आले. 2016 मध्ये ही वास्तू पूर्ण झाली. भारतातील ही 140वी सर्वात उंच इमारत आहे. तर जगात ती 7,900 क्रमांकावर आहे.
सर्वच सोयी-सुविधा
जे. के. हाऊसमध्ये जगातील जवळपास सर्वच सोयी-सुविधा आहेत. यामध्ये जीम, स्पा, स्विमिंग पूलपासून ते होम थिएटरपर्यंत सर्वच सुविधा आहेत. या इमारतीच्या 5 व्या मजल्यापर्यंत केवळ वाहनतळाची सुविधा आहे. या इमारतीवर एक हेलीपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. या इमल्याची अंदाजित किंमत जवळपास 6,000 कोटी रुपये आहे.
रेमंड समूहाचे गौतम सिंघानिया यांचे घर
जे. के. हाऊसचे मालक गौतम सिंघानिया हे आहेत. ते रेमंड समूहाचे मालक आहेत. त्यांचे खासगी आयुष्य सातत्याने चर्चेत आहे. नवाज मोदी यांनी पती गौतम सिंघानिया यांच्यावर कौटुंबिक छळाचा आरोप केला. पती मुलींना आणि आपल्याला मारझोड करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. मुलगी निहारिकाला गौतम यांनी 15 मिनिटे मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. नवाज यांनी पतीच्या एकूण 11,660 कोटींच्या संपत्तीत 75% टक्के वाटा मागितला आहे. ही रक्कम 8745 कोटी रुपये होते. यामध्ये दोन मुली निहारिका आणि निसा आणि नवाज यांचा वाटा असेल. गौतम सिंघानिया यांनी घराबाहेर हकलल्याचा आरोप त्यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी केलेला आहे.