AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anti-Sex Beds in Paris Olympics : पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत खेळाडूंच्या रुममध्ये ‘अँटी सेक्स’ बेड, ही काय भानगड आहे? जाणून घ्या काय आहे प्रकरण

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलम्पिक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. खेळाडू या जागतिक मंचासाठी कसून सराव करत आहे. प्रत्येकालाच सुवर्णपदकाची स्वप्न पडत आहेत. पण ही स्पर्धा अजून एका खास कारणावरुन गाजत आहे...

Anti-Sex Beds in Paris Olympics : पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत खेळाडूंच्या रुममध्ये 'अँटी सेक्स' बेड, ही काय भानगड आहे? जाणून घ्या काय आहे प्रकरण
या बेडची चर्चा जास्त चर्चा
| Edited By: | Updated on: Jul 12, 2024 | 1:22 PM
Share

पॅरिस ऑलम्पिक आता हाता-तोंडावर आली आहे. अवघ्या दोन महिन्यात जगातील खेळाडूंसाठी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये कुंभमेळा भरेल. अव्वलच नाही तर नवख्या खेळाडूला पण या स्पर्धेत इतिहास घडवायचा आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच एका निर्णयामुळे चर्चेत आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी अँटी सेक्स बेडची चर्चा सध्या जगभर पसरली आहे. काही मीडिया हाऊसने याविषयीचा दावा केला आहे. प्राप्त माहितीनुसार, खेळाडूंना अल्ट्रा लाईट बेड (Ultra light Cardboard beds) देण्यात येणार आहे.

खेळाडूंचा फोकस हलू द्यायचा नाही

न्यूयॉर्क पोस्टने एका वृत्तात याविषयीचा दावा केला आहे. त्यानुसार 2024 मधील ऑलम्पिक स्पर्धांमध्ये खेळाडूंचा त्यांच्या वैयक्तिक आणि सांघिक खेळावरुन फोकस हलू न देण्यासाठी हे ‘कुटाणे’ करण्यात येत आहेत. त्यासाठीच हे अँटी सेक्स बेड देण्यात येणार आहे. या बेडचे मटेरियल आणि आकार असा ठेवण्यात आला आहे की खेळाडूच्या कामुकतेला चालना मिळणार नाही. एअरवेव (Airweave) या कंपनीने हे बेड तयार केले आहे. 2020 मधील टोकियो येथील ऑलम्पिक स्पर्धांसाठी याच कंपनीने उत्पादनं तयार केली होती.

पहिल्यांदा जपानमध्ये झाला प्रयोग

अल्ट्रा लाईट कार्डबोर्ड बेडचा पहिल्यांदा जपानमध्ये आयोजित टोकियो ऑलम्पिकमध्ये करण्यात आला. खेळाडूंची कामुकता वाढू नये आणि त्यांचे खेळावरील लक्ष विचलित होऊ नये यासाठी हा प्रयोग करण्यात आल्याची अफवा पसरली होती. अर्थात याविषयी दोन मत प्रवाह समोर येत आहेत. एकामध्ये खेळाडूला चांगली झोप लागावी. क्रीडा प्रकारावर खेळाडूला लक्ष केंद्रीत करता यावं यासाठी या बिछान्यांचा वापर होत असल्याचा दावा करण्यात येतो. तर दुसऱ्या दाव्यात अर्थात त्यांची कामवासना रोखण्याचा प्रयोग या बेडच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येतो.

कार्डबोर्ड बिछान्याचा वापर कशासाठी

ऑलम्पिकमध्ये अँटी-सेक्स बेडचा मुद्दा तापल्यावर USA Today ने याविषयीची सत्यतेचा पडताळा केला. कार्डबोर्ड बेडचा उद्देश कामवासनेला अटकाव करणे असल्याच्या दाव्यात कुठलेही सत्यता नसल्याचे त्यात स्पष्ट झाले. या बेडचे वजन 200 किलो आहे. त्यामुळे कामवासना कमी होण्याच्या दाव्यात काही अर्थ नव्हता. दीर्घकाळ वापरासाठी आणि पर्यावरण पूरक म्हणून या बेडचा वापर होत असल्याचे टोकियो ऑलम्पिकचे आयोजक ताकाशी किताजिमा यांनी स्पष्ट केले. पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा 2024, 26 जुलै रोजी सुरु होत आहे. या स्पर्धा 11 ऑगस्टपर्यंत चालतील.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.