ऑलिम्पिक 2024
ऑलिम्पिक खेळाचा इतिहास खूप जुना आहे. इसवी सन 1200 पूर्वी योद्धा आणि खेळाडूंमध्ये प्राचीन ऑलिम्पिक खेळाचं आयोजन केलं जात होतं. प्राचीन ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग, कुस्ती आणि घोडेस्वारी आदी खेळांचं आयोजन केलं जायचं. खेळात विजयी झालेल्यांना मूर्त्या देऊन गौरवलं जायचं. त्यानंतर काळानुसार या खेळाचा विकास झाला. आता हा खेळ दर चार वर्षांनी खेळवला जातो. ऑलिम्पिक स्पर्धांच्या वर्षाला 'ऑलिम्पियाड' म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा ऑलिम्पिक खेळ ही एक विविध खेळांची स्पर्धा आहे. साधारण 15 दिवस ही स्पर्धा आयोजित केली जाते. भारताने ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच 1928मध्ये सूवर्णपदक जिंकलं होतं. त्यावेळी भारताला पहिल्यांदाच एकावेळी तीन पदकेही मिळाले होते. यंदा फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात होणार आहे. 26 जुलैपासून ते 11 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. सीन नदीवर पॅरिस ऑलिम्पिकचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ऑलिम्पिक 2028 स्पर्धेतील क्रिकेटचं वेळापत्रक जाहीर, या दिवशी होणार अंतिम सामना
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेप्रमाणे क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत ते ऑलिम्पिक स्पर्धेचे... कारण 100 वर्षानंतर क्रिकेटचं ऑलिम्पिक स्पर्धेत पुनरागमन होणार आहे. असं असताना तीन वर्षाआधीच ऑलिम्पिक स्पर्धांचं वेळापत्रक समोर आलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 13, 2025
- 6:26 pm