AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑलिम्पिक 2028 स्पर्धेतील क्रिकेटचं वेळापत्रक जाहीर, या दिवशी होणार अंतिम सामना

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेप्रमाणे क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत ते ऑलिम्पिक स्पर्धेचे... कारण 100 वर्षानंतर क्रिकेटचं ऑलिम्पिक स्पर्धेत पुनरागमन होणार आहे. असं असताना तीन वर्षाआधीच ऑलिम्पिक स्पर्धांचं वेळापत्रक समोर आलं आहे.

ऑलिम्पिक 2028 स्पर्धेतील क्रिकेटचं वेळापत्रक जाहीर, या दिवशी होणार अंतिम सामना
ऑलिम्पिक 2028 स्पर्धेतील क्रिकेटचं वेळापत्रक जाहीर, या दिवशी होणार अंतिम सामनाImage Credit source: TV9 Network/Telugu
| Updated on: Nov 13, 2025 | 6:26 PM
Share

ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचं आयोजन लॉस एंजेलिसमध्ये होणार असून या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेला 14 जुलै 2028 पासून सुरुवात होणार असून स्पर्धा 30 जुलैपर्यंत असेल. आतापर्यंत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तुलनेत ही सर्वात मठी स्पर्धा असणार आहे. कारण या स्पर्धेत 36 वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी लॉस एंजेलिस आणि ओक्लाहोमा सिटीतील 49 ठिकाणं आणि 18 झोन ठरवण्यात आले आहेत. पण या स्पर्धेतील क्रिकेटच्या पुनरागमनची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. कारण 100 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट स्पर्धा खेळली जाणार आहे. ऑलिम्पिक 2028 स्पर्धेतील क्रिकेटचा पहिला सामना 12 जुलैला खेळला जाईल. तर अंतिम सामना 29 जुलैला होणार आहे. क्रिकेट, बेसबॉल, सॉफ्टबॉल आणि स्क्वॅश सारख्या खेळांच्या पुनरागमनामुळे आणि नवीन स्पर्धांच्या परिचयामुळे ही ऑलिम्पिक स्पर्धा अनेक ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार ठरणार आहे.

लॉस एंजेलिसमध्ये ऑलिंपिक खेळांचे आयोजन होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 1932 आणि 1984 मध्ये स्पर्धा झाली होती. लॉस एंजेलिस 2028 स्पर्धेचे सीईओ रेनॉल्ड हूवर यांनी सांगितलं की, ‘जानेवारी 2026 पासून तिकिटाचं वितरण सुरु होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना कोणता सामना पाहायचं ते आताच निश्चित करता येणार आहे. कोणते खेळ तुमच्या शहरात होणार आहे आणि कोणते ऐतिहासिक क्षण तुम्हाला आठवणीत ठेवायचे आहेत याचं नियोजन करता येईल.’ 15 जुलै रोजी उद्घाटनाच्या दिवशी महिला ट्रायथलॉनने स्पर्धेची सुरुवात होईल. या दिवशी 100 मीटर शर्यतीच्या तीन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आलं आहे. एखाद्या मोठ्या स्पर्धेत एकाच दिवशी तीन शर्यती आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 स्पर्धा इतिहासात लिंग समानतेसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित करणार आहे.  कारण या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच महिला स्पर्धकांची संख्या ही पुरूष स्पर्धकांपेक्षा अधिक असणार आहे. तसेच 29 जुलै हा दिवस “सुपर सॅटर्डे” म्हणून साजरा केला जाईल. कारण या दिवशी 23 खेळांमध्ये 26 अंतिम सामने होणार आहेत. त्यामुळे हा दिवस ऐतिहासिक असणार आहे. यात 15 सांघिक स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि कांस्य पदके आणि 15 वैयक्तिक स्पर्धांमध्ये अंतिम सामने असतील.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.