ऑलिम्पिकमध्ये वजन तर इथे वय आड, विनेशला राज्यसभेत जाण्याची किती संधी? शेवटचा मार्ग काय?
Vinesh Phogat Rajya Sabha Criteria: विनेश फोगाटला वाढीव वजनामुळे हक्काच्या रौप्य पदकाला मुकावं लागलं. तिला पॅरिसहून रिकाम्या हाती परतावं लागलं. मात्र तिचा यथोचित सन्मान व्हावा, यासाठी तिला राज्यसभेवर पाठवण्याची विनंती आहे. मात्र त्यासाठी विनेशचं वय कमी आहे.

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीला वाढीव वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे भारताला हक्काचं रौप्य पदक गमवावं लागलं. विनेशने या अपात्रतेच्या निर्णयाला क्रीडा लवादात आव्हान दिलं. मात्र तिथेही तिच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे विनेशला भारतात रिकाम्या हाती परतावं लागलं. मात्र त्यानंतरही विनेशचा योग्य सन्मान करत तिला राज्यसभेवर पाठवण्यात यावं, अशी मागणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र विनेशला इथेही तिचं दुर्देव आडवं आलं. विनेशला तिथे वाढीव वजनामुळे पदक गमवावं लागलंय. तर इथे विनेशला कमी वयामुळे इच्छा असूनही राज्यसभेवर जाता येणार नाही. विनेशची राज्यसभेची वाट वयामुळे नक्की कशी अडतेय? तसेच तिला राज्यसभेत पाठवण्याचा दुसरा पर्याय नाही का? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. मात्र त्याआधी विनेशसोबत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय झालं? हे समजून घेऊयात. ...
