AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत जाणार, कारण की…

IND vs PAK, T20 World Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्या आयसीसी टी20 वर्ल्डकप वेळापत्रकानुसार 15 फेब्रुवारीला सामना होणार आहे. या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी भारतीय संघ श्रीलंकेत जाणार आहे. का ते समजून घ्या.

T20 WC 2026 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत जाणार, कारण की...
T20 WC 2026 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत जाणार, कारण की...Image Credit source: PTI
| Updated on: Feb 02, 2026 | 10:15 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत भिडणार हे स्पष्ट होतं. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 फेब्रुवारीला नियोजित आहे. हा सामना कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार असल्याने तसंच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. पाकिस्तानने राजकीय कारण पुढे करत भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने न्यूट्रल ठिकाणी शिफ्ट केले आहेत. पण पाकिस्तानच्या कुरापती संपूर्ण जगाला परिचित आहेत. आता बांगलादेशवर अन्याय झाल्याचं कारण पुढे केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे. असं असलं तरी भारतीय संघ श्रीलंकेत जाणार आहे. त्याचं कारणंही तसंच आहे.

भारतीय संघ आयसीसी स्पर्धेत आयसीसीचा प्रोटोकॉल फॉलो करणार आहे. आयसीसीच्या प्रोटोकॉलनुसार, टीम इंडिया श्रीलंकेत जाईल. टीम इंडिया ठरल्याप्रमाणे सरावही करेल. त्यानंतर पत्रकार परिषदेला सामोरं जाईल. इतकंच काय तर सामना सुरू होण्याच्या वेळेत मैदानात हजर असेल. जर पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला नाही तर सामनाधिकारी हा सामना रद्द करतील. टीम इंडिया या प्रक्रियाचं तंतोतंत पाळण करतील आणि नंतरच मैदान सोडतील. साखळी फेरीत भारताच्या वाटेला फुकटचे 2 गुण मिळणार आहेत. खरं तर दोन गुण विजयानंतर मिळतात. पण पाकिस्तानने बहिष्काराचा निर्णय घेतल्याने भारताला फायदा होणार आहे.

आयसीसीने स्पष्ट केलं की…

पाकिस्तानच्या निर्णयानंतर आयसीसीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या निर्णयावर विचार करण्यास सांगितलं आहे. तसेच एकत्र बसून यावर तोडगा काढण्याची अपील केली आहे. आयसीसीने स्पष्ट केलं की, ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सूचनेची वाट पाहात आहोत. आयसीसी स्पर्धा स्पोर्टिंग प्रामाणिकपणा, स्पर्धा, सातत्य आणि निष्पक्षतेवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, निवडक सहभागामुळे स्पर्धेचे पावित्र्य आणि आत्मा कमकुवत होतो. तथापि, राष्ट्रीय धोरणांशी संबंधित बाबींमध्ये आयसीसी सरकारच्या भूमिकेचा आदर करते.’

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...