
Share Market IT Stocks: जागतिक बाजारात विक्री सत्र सुरू झाल्याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीत भूकंप आला. दोन्ही इंडेक्स आपटले. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 10.29 वाजता, 815.78 अंकांनी, 0.97 टक्क्यांनी घसरला. तर निफ्टीमध्ये जवळपास त्याचवेळी 258.65 अंक अथवा 0.99 टक्क्यांची घसरण झाली. आयटी क्षेत्रातील शेअरच्या तुफान विक्रीने बाजाराला मोठा हादरा बसला. भारतीय शेअर बाजारातील या क्षेत्रातील शेअर जवळपास 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. या दोन दिवसात व्यापारी आणि गुंतवणूकदारांचे जवळपास 10 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. गेल्या बुधवारी शेअर बाजार सकारात्मक सलामी देऊन बंद झाला होता. तेव्हा बीएसईचे मार्केट कॅप 474 लाख कोटी रुपये होते. तर आता ते घसरून 465 लाखांवर आले आहे.
गुरुवारी पण सर्वच क्षेत्रात नफा बुक झाला. IT स्टॉक्समध्ये विक्री सत्राने भारतीय स्टॉक मार्केटमध्ये घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स हा 558.72 अंक वा 0.66% घसरून 83,674.92 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 50 146.65 अंक वा 0.57% घसरून 25,807.20 वर बंद झाला होता. तर सेन्सेक्स जवळपास 700 अंकांनी घसरला.
बाजारात मोठी घसरण का?
मिंटच्या वृत्तानुसार, जियोजित इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट, डॉ. व्हीके विजयकुमार यांनी सांगितले की बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. बाजारात संधी आहे. पण दबावही आहे. US बाजारात AI स्टॉक्समध्ये विक्री होण्याची अपेक्षा होती. पण त्याची वेळ आणि मर्यादेचा अंदाजा नव्हता. नॅस्डॅकमध्ये 2.04% घसरण आली. जर ही घसरण सुरूच राहिली तर अमेरिकन शेअर बाजारात अजून मोठी घसरण होऊ शकते.
आज भारताय शेअर बाजारात असा भूंकप का आला यावर जियोजित इन्व्हेस्टमेंट तज्ज्ञांनी माहिती दिली की भारतीय बाजारात आयटी क्षेत्रातील स्टॉक्समुळे विक्री सत्र सुरू झाले. इंडिया इंकमध्ये नफा कमावून देण्यासाठी हा पूल महत्त्वाचा होता. पण आयटी क्षेत्राला मोठा हादरा बसला. अर्थात हे कशामुळे झाले हे समोर आलेले नाही. तर सध्या गुंतवणूकदार घाबरलेले आहे, असं म्हणणं ही कदाचित घाईघाईचं होईल, पण ते बाजार स्थिर होण्याची अपेक्षा करत असतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
तर घौडदोड करणाऱ्या अमेरिकन डॉलरला सारखे धक्के बसत आहेत. तिसऱ्या सत्रात डॉलरमध्ये किंचित घसरण दिसली. डॉलर 90.67 अंकावर उघडला. भारतीय रुपया तर घसरलेला आहेच. या सर्व घडामोडींचा परिणामही बाजारावर दिसून येत आहे. इतरही अनेक कारणं यामागे असू शकतात.