AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : 1 लाखाचे झाले 12 कोटी, 5 वर्षांत करोडपती बनवणाऱ्या बाहुबली स्टॉकची चर्चा!

शेअर बाजारात काही शेअर तुम्हाला भरपूर परतावा देतात. सध्या अशाच एका शेअरची सगळीकडे चर्चा होत आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त पाच वर्षांत करोडपती केले आहे.

Share Market : 1 लाखाचे झाले 12 कोटी, 5 वर्षांत करोडपती बनवणाऱ्या बाहुबली स्टॉकची चर्चा!
stock market
| Updated on: Sep 10, 2025 | 7:07 PM
Share

Share Market : शेअर बाजार हे असे क्षेत्र आहे जिथे गुंतवणूकदारावर एका क्षणात पैशांची बरसात होते. तर कधीकधी शेअर बाजारात माणूस कंगालही होतो. म्हणूनच या क्षेत्रात व्यवस्थित अभ्यास करून गुंतवणूक केल्यास पैसे बुडण्याचा धोका टाळता येतो. शोध घेतल्यास शेअर बाजारात काही समाभाग असे आहेत ज्यात गुंतवणूक केल्यास पैसे वाढण्याची हमखास शक्यता असते. सध्या अशाच एका शेअरची चर्चा होत आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना पाच वर्षांत करोडपती केले आहे.

5 वर्षांत गुंतवणूकदार झाले कोट्यधीश

या शेअरचे नाव Hitachi Energy India असे आहे. या शेअरने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस असा परतावा दिलेला आहे. 2020 साली हा शेअर फक्त 15 रुपयांवर होता. म्हणजेच 2020 साली एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज या गुंतवणूकदाराच्या एक लाख रुपयांचे मूल्य तब्बल 12.60 कोटी रुपये झाले असते. म्हणजेच पाच वर्षांत गुंतवणूकदार थेट कोट्याधीश झाला असता. पाच वर्षात Hitachi Energy India हा शेअर तब्बल 12500 पटीने वाढला आहे. अशा पद्धतीचा परतावा फारच कमी शेअर देतात.

सध्या Hitachi Energy India शेअरची स्थिती काय?

सध्या Hitachi Energy India हा शेअर मुंबई शेअर बाजारावर आहे. सध्या या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य 19877 रुपये आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 64 टक्क्यांनी परतावा दिलेला आहे. या वर्षात Hitachi Energy India या शेअरचे मूल्य 25 टक्क्यांनी वाढले आहे. पाच वर्षांपूर्वी या शेअरचे मूल्य फक्त 15 रुपये होते.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?

शेअर बाजारात गुंतवणूक करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. काही शेअर अल्पावधीत तुम्हाला भरपूर परतावा देतात. पण हाच शेअर तुम्हाला एका क्षणात कंगालही करू शकतो. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य तो अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करूनच गुंतवणूक करायला हवी, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसण्याचा धोका असतो.

(Disclaimer- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखातून गुंतवणुकीचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच