Share Market | नवरत्न कंपनी करणार मालामाल, 5.25 रुपये लाभांश देणार

| Updated on: Feb 13, 2024 | 11:27 AM

Share Market | या सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली. कंपनीने शेअरधारकांना 5.25 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर या आर्थिक वर्षात ही कंपनीने गुंतवणूकदारांना 20.5 रुपयांचा लाभांश देणार आहे. यापूर्वी या नवरत्न कंपनीने गुंतवणूकदारांना 15.25 रुपयांचा डिव्हिडंड दिला आहे.

Share Market | नवरत्न कंपनी करणार मालामाल, 5.25 रुपये लाभांश देणार
Follow us on

नवी दिल्ली | 13 February 2024 : देशाची नवरत्न कंपन्यांपैकी एक कोल इंडियाने डिसेंबरच्या तिमाहीत जोरदार कमाई केली आहे. कोल इंडियाने आर्थिक वर्ष 2023-24 च्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक शेअरवर 5.25 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली. कंपनी बोर्डाने मुख्य अर्थ आधिकारी म्हणून मुकेश अग्रवाल यांच्या नियुक्तीला पण मंजुरी दिली आहे. या आर्थिक वर्षात कंपनी गुंतवणूकदारांना 20.5 रुपयांचा लाभांश देणार आहे. यापूर्वी कोल इंडियाने शेअरधारकांना 15.25 रुपयांचा लाभांश दिला आहे.

रेकॉर्ड डेट 20 फेब्रुवारी

कंपनीने या डिव्हिडेंडसाठी 20 फेब्रुवारी रेकॉर्ड डेट ठरवली आहे. तर हा लाभांश हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच म्हणजे 12 मार्च रोजी देण्यात येणार आहे. या घोषणेनंतर या आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांना लाभांश रुपात 20.5 रुपये देत आहे. गेल्या वर्षी कोल इंडियाने त्यांच्या गुंतवणूकदारांना 15.25 रुपयांचा डिव्हिडंड दिला आहे.

हे सुद्धा वाचा

नफा सर्वकालीन उच्चांकावर

  1. कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे सोमवारी एकत्रित निव्वळ नफ्यात 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 9,069 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी हाच आकडा 7,755 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाही दरम्यान नफ्याने सर्वाकालीन उच्चांक 12,375 कोटी रुपयांवर पोहचला. नेट प्रॉफिट गेल्या सप्टेंबरच्या तिमाहीच्या तुलनेत 33 टक्के वाढून 6,800 कोटी रुपयांवर पोहचला.
  2. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 26,268 कोटी रुपये होता. तर गेल्या वर्षीच्या तिमाहीत हा आकडा 26,246 कोटी रुपये होता. खर्च आटोक्यात ठेवण्यात कंपनील यश आल्याचे दिसते. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 3 टक्क्यांनी वधारला. तो 36,154 कोटीपर्यंत पोहचला. तर गेल्यावर्षात याच समान कालावधीत हा आकडा 35,169 कोटी रुपये इतका होता.
  3. कोल इंडियचा शेअर सोमवारी 4.80 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 434.30 रुपयांवर होता. या स्टॉकने गेल्या सहा महिन्यात 85 टक्क्यांचा परतावा दिला. तर एक वर्षात गुंतवणूकदारांची गुंतवणूक दुप्पटीहून अधिक झाली. या कालावधीत कोल इंडियाने 103 टक्के रिटर्न दिला. ज्या शेअरधारकांनी या कंपनीत जास्त गुंतवणूक केली. त्यांना या वर्षात दुहेरी फायदा झाला. त्यांना डिव्हिडंडमधून पण फायदा झाला. तर शेअर वधारल्याने ते मालामाल झाले.