Success Story : घर विकलं, लाखोंची नोकरी सोडली, जोडप्याने सुरू केला समोश्याचा व्यवसाय; आता दररोज करतात 12 लाखांची कमाई

फक्त एक व्यवसाय उभा करण्यासाठी या जोडप्याने होतं नव्हतं ते सर्व पणाला लावलं, अगदी स्वत:चं घरही विकलं, पण या जोडप्याने असा काही व्यवसाय केलायं की त्यातून ते दरदिवशी 12 लाखांपर्यंतची कमाई करतं आहेत.

Success Story : घर विकलं, लाखोंची नोकरी सोडली, जोडप्याने सुरू केला समोश्याचा व्यवसाय; आता दररोज करतात 12 लाखांची कमाई
| Updated on: Nov 24, 2026 | 4:09 PM

समोसा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चहासोबत गरमागरम समोसा खाण्याची मज्जाच काही और असते. पण याच साध्या समोश्याला व्यवसायाचं रूप देतं. बंगळूरूमधील एका जोडप्याने स्वत:चा ब्रँड उभा केला. विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली आणि स्वत: चं ड्रिम हाऊसही विकलं. शिखर वीर सिंह आणि निधी सिंह असं या जोडप्याचं नाव असून त्यांच्या व्यवसायाचं नाव आहे. समोसा सिंह आज या ब्रँडचे देशभरात अनेक आउटलेट्स आहेत.

लाखोंचा पगार सोडून समोशांच्या व्यवसायात उडी

शिखर आणि निधी यांची भेट हरियाणामध्ये बीटेकच्या शिक्षणादरम्यान झाली होती. दोघांनीही Bio- Technology चं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर ते बॉयकोन कंपनीत सायंटिस्ट म्हणून कामाला होतं.त्याचं वार्षिक पॅकेज जवळपास 30 लाखांचे होते. मात्र शिखर यांच्या मनात स्वत: चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. त्यांना समोशांचा व्यवसाय करायचाच होता.सुरूवातीला या कल्पनेला किती प्रतिसाद मिळेल याबाबत त्यांना शंका होती. पण एका फूड कोर्टमध्ये समोश्य़ासाठी मुलाला रडताना पाहून त्यांचा विश्वास दृढ झाला. अखेर 2015 मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि व्यवसायाची तयारी केली

Loading...

स्वत:चं 80 लाखांचे घर विकले

2016 मध्ये त्यांनी समोसा सिंह ची सुरूवात केली. सुरूवातीला स्वत:च्या सेव्हिंगमधून त्यांनी व्यवसाय उभा केला. मात्र ग्राहकांची मागणी वाढू लागल्यावर मोठ्या स्वयंपाकघराची गरज भासू लागली. विशेषत:एका जर्मन इंजिनीअरिंग कंपनीकडून दिवसाला 8, ००० समोसे पुरवण्याची मोठी मागणी आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे त्यांना आपले ड्रिम होम विकावे लागले. त्यातून त्यांनी नवं स्वयंपाकघर उभारलं.

बटाटाच्या समोशापासून ते हटके चवीपर्यंत

समोसा सिंह ची खासियत म्हणजे समोशांमधील वेगवेगळे प्रयोग, पारंपरिक बटाटा समोश्यासोबतच त्यांनी मंच्युरियन, कढई पनीर, चिली चीज आणि बटर चिकन अशा वेगवेगळ्या चवींचे समोसे ग्राहकांसाठी आणले. समोशांसोबतच कचोरी अशा वेगवेगळ्या चवींचे समोसे ग्राहकांसाठी आणले. समोशांसोबत कचोरी, पाणीपुरी, दहीपुरी,वडा पाव, दाबेली आणि इतर खाद्यपदार्थही त्यांच्या मेन्यूमध्ये समाविष्ट झाले.

2023 मध्ये या ब्रँडची देशभरात 40 हून अधिक आउटलेट्सं असल्याची माहिती आहे. त्यावेळी समोशांच्या विक्रीतून दररोज 12 लाख रूपयांची कमाई होत असल्याची माहिती आहे.

मात्र या आकड्यांबाबत एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. एका मुलाखीतीत या जोडप्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कमाईच्या आकड्यांबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. 45 कोटी रूपये ही त्या कंपनीची वार्षिक रनरेट असल्याचं स्पष्ट केलं. नोकरी, सुरक्षित पगार आणि स्वत:चं घर सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेणाऱ्या या जोडप्याने समोशासारखा साध्या पदार्थाला ब्रँडचे रूप दिले. त्यांच्या प्रवासातून एक गोष्ट नक्की दिसते. व्यवसायाची मोठी कल्पना असण्यापेक्षा ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नियोजन, मेहनत आणि जोखीम घेण्याची तयारी महत्त्वाची असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us