AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Business Ideas : आता मिटेल पैशांची चिंता, ‘या’ 4 व्यवसायांमधून कमवाल रोज पैसा, दुसरा महिलांच्या आवडतीचा

Business Ideas : अनेक जण आता एकच विचार करतात आणि तो म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा... व्यवसाय सुरु करण्याचा विचार केल्यानंतर कोणता व्यवसाय करायचा. याचाच विचार सगळे करतात. तर जाणून घ्या कोणता व्यवसाय केला पाहिजे...

Business Ideas : आता मिटेल पैशांची चिंता, 'या' 4 व्यवसायांमधून कमवाल रोज पैसा, दुसरा महिलांच्या आवडतीचा
| Updated on: Nov 24, 2026 | 4:05 PM
Share

Business Ideas : सध्याची परिस्थिती पाहिली तर, कोणाची नोकरी जाईल आणि नोकरी टिकून राहिली तरी किती दिवस टिकून राहिल, याबद्दल कोणतीच कल्पना नसते. अशात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयच्या वापरामुळे आता नोकऱ्या देखील संपत आहेत. वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लाखो लोक आपल्या नोकऱ्या गमावत आहेत. कंपन्यांमधील कर्मचारी कपातीमुळे, लाखो रुपये कमावणारे कर्मचारी आपले उत्पन्न गमावून बेरोजगार होत आहेत. या प्रक्रियेत, अनेक लोक आतापर्यंत जमा केलेल्या पैशातून एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत तुम्ही चार व्यवसाय घरूनच सुरु करु शकता… तर जाणून घ्या कोणते आहेत ते चार व्यावसाय..

वॉशिंग मशीन, ड्रायर आणि इस्त्री मशीन बसवून तुम्ही कमी खर्चात ड्राय क्लीनिंगचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही रुग्णालये, हॉटेल्स इत्यादींसोबत करार करू शकता. यातून तुम्हाला रोजचं उत्पन्न मिळेल. नुकताच शहरांमध्ये उपकरणे भाड्याने देण्याचा व्यवसाय चांगला चालत आहे. तुम्ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फोटोग्राफी, बाईक्स आणि कार्यक्रमाच्या सजावटीच्या वस्तू भाड्याने देऊन पैसे कमवू शकता.

लोकांना आता वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला प्रचंड आवडतं. म्हणूनच सध्या बाजारात फूड डिलिव्हरी ॲप्सची प्रचंड क्रेझ आहे. यामुळे, क्लाउड किचन सुरू करणं फायदेशीर ठरू शकतं. स्विगी आणि झोमॅटोसारख्या ॲप्सद्वारे खाद्यपदार्थ तयार करून विकता येतात. तसेच, डिजिटल मार्केटिंग आणि व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट्सच्या माध्यमातून नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचता येते. याशिवाय, शहरांमध्ये आणि गावांमध्ये लॉन्ड्री आणि ड्राय क्लीनिंग सेवांना नेहमीच मागणी असते.

तरुणी ब्युटी सलूनचा वापर करु शकतात. ब्युटी सलूनचा व्यवसाय तुम्हाला रोजच्या रोज उत्पन्न मिळवून देतो. मेकअप, हेअर स्टायलिंग इत्यादी सेवा देऊन तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. ग्राहकांना दर्जेदार सेवा दिल्याने तुमच्या सलूनची लोकप्रियता आणखी वाढेल. फ्रँचायझीचा विस्तार करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. त्यासाठी कुशल ब्युटीशियनना कामावर ठेवणं पुरेसे आहे.

जुन्या वस्तू दुरुस्त करून आणि त्या सेकंड-हँड वस्तू म्हणून विकून तुम्ही रोजचे उत्पन्न देखील मिळवू शकता. लॅपटॉप आणि मोबाईलसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे कमी किमतीत खरेदी करून, ती दुरुस्त करून आणि विकून अधिक उत्पन्न मिळवण्याचा एक मार्ग आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय सुरु करताना सर्व गोष्टींचा विचार नक्की करा…

Follow Us
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने..
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने मनसे आक्रमक
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपद
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
Pratap Sarnaik on Rohit Pawar : रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने...
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!
आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये...
Onion Price Crash : आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके...
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात....
Manoj Jarange Case : मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात; पेन ड्राइव्हमधील पुराव्याने खळबळ
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
Parinay Fuke : रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ