Gold Price: दिवाळीनंतर लग्नसराईच्या मोसमात सोन्याचा भाव वाढणार का?

| Updated on: Nov 14, 2021 | 7:24 AM

Gold | कोरोनाच्या काळात पहिल्यांदाच लोकांनी घराबाहेर पडून दिवाळीची खरेदी केली. किंमती कमी असल्याने लग्नसराईच्या आधीच आगाऊ खरेदीला उधाण आले आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिवाळीनंतर लोक आता लग्नसराईसाठी खरेदीसाठी जात आहेत.

Gold Price: दिवाळीनंतर लग्नसराईच्या मोसमात सोन्याचा भाव वाढणार का?
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नवी दिल्ली: पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. लग्नसराईच्या हंगामात सोन्याचे भाव वाढणार असल्याचे कमोडिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सोने 49 हजार झाले असून लवकरच ते 50 हजारांचेही होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या काळात पहिल्यांदाच लोकांनी घराबाहेर पडून दिवाळीची खरेदी केली. किंमती कमी असल्याने लग्नसराईच्या आधीच आगाऊ खरेदीला उधाण आले आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिवाळीनंतर लोक आता लग्नसराईसाठी खरेदीसाठी जात आहेत.

दिवाळीत 75 हजार कोटींची सोने विक्री

सीएआयटीच्या म्हणण्यानुसार या दिवाळीत 75 हजार कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली आहे. एकट्या दिल्लीत 9000 कोटी रुपयांचे सोने विकले गेले आहे. या दिवाळीत देशभरात सुमारे 45 टन सोन्याची विक्री झाली आहे. हे प्री-कोविड पातळीपेक्षा 35 टक्क्यांनी जास्त आहे. यावर्षी दिवाळीत 45 टन सोन्याची विक्री झाली, तर 2019 मध्ये 30 टन सोन्याची विक्री झाली.

ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेत चलनवाढीचा दर तीन दशकांच्या उच्चांकावर पोहोचला, तर जपानमध्ये सध्या महागाईचा दर चार दशकांच्या उच्चांकावर आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये आपल्या देशात महागाई वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे सोन्यातील गुंतवणूकीकडे कल वाढला आहे. कारण ते महागाईविरूद्ध हेजिंग म्हणून काम करते. मागणी वाढल्यामुळे यावेळी सोन्या-चांदीत उसळी आहे. यावेळी चांदीने तीन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.

सोन्यात नेगेटिव्ह रिटर्न्स

गेल्यावर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यंदा सोन्याने 6 टक्क्यांनी नकारात्मक परतावा दिला आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वीच्या दिवाळीच्या तुलनेत तो 24टक्क्यांनी अधिक आहे. तीन वर्षांपूर्वीच्या दिवाळीच्या तुलनेत हा परतावा 60 टक्क्यांपर्यंत आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत दरवर्षी साधारणपणे 150-180 टन सोन्याची विक्री होते. मात्र, या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 225-250 टन सोन्याची विक्री झाल्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेत तुमचं खातं आहे का, रिझर्व्ह बँकेची कारवाई; खात्यामधून फक्त 1000 रुपयेच काढता येणार

सोशल मीडियावर आधार क्रमांक शेअर करणं योग्य आहे का, UIDAI कडून महत्त्वाची सूचना

पंतप्रधान मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अदानींचा पुढाकार; 5 लाख कोटींचा मेगाप्लॅन प्रत्यक्षात कसा उतरवणार?