Swiggy Instamart : Amazon-Flipkartनंतर आता Swiggy Instamart च्या सेलचा धमाका; इलेक्ट्रॉनिक्सपासून ग्रोसरीपर्यंत डिस्काउंट
Swiggy Instamart च्या Quick India Movement Sale मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू, सौंदर्यप्रसाधने आणि खेळण्यांवर विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. काही वस्तूंवर 50 ते 90 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. निवडक बँक कार्डवर एक्स्ट्रा बचतीची संधी आहे.

ऑनलाईन शॉपिंग म्हटलं की Amazon आणि flipkart च्या सेलची आधी चर्चा होते. पण आता घरबसल्या काही मिनिटांत सामान पोहोचवणाऱ्या क्विक कॉमर्स अॅप्सनीही मोठ्या ऑफर्स देण्यास सुरूवात केली आहे. SWIGGY आणि INSTAMART वर क्किक इंडिया मूव्हमेंट हा annual sale सुरू केला असून यात iPhone, laptop पासून घरगुती वस्तू आणि खाण्याच्या पदार्थांपर्यंत अनेक गोष्टींवर डिस्काउंट्स मिळत आहेत. तसेच कंपनीने काही गोष्टिंवर 50 ते 90 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. iPhone 17 pro आणि MacBook वरही ऑफर या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंकडे ग्राहतकांचं विशेष लक्ष असू शकतं. Instamart वर Apple iPhone 17 pro च्या 256GB मॉडेलची किंमत 1,19,999 रूपये ठेवण्यात आली आहे. सॅमसंगचे स्मार्टफोन 10,999 रूपयांपासून, तर APPLE MACBOOK 66,900 रूपयांपासून उपलब्ध असल्याचं सांगितलं जातं आहे. ...