सौरव दास यांचं चुकलंच, तर…, सरकारने त्यांना व्हिआयपी ट्रिटमेंट देऊन परदेशात पाठवलं असतं, दिपकेंचा संताप
कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य असलेल्या सैरव दास यांना लंडनला जाताना विमानतळावर अडवल्याचा आरोप होत आहे. यावरून आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य असलेल्या सैरव दास यांना लंडनला जाताना विमानतळावर अडवल्याचा आरोप होत आहे. यावरून आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सैरव दास यांची सगळ्यात मोठी चुक ही झाली की त्यांनी कोणताही स्कॅम केलेला नाहीये. जर सैरभ दास यांनी एखादा मोठा स्कॅम केला असता, लोकांना चुना लावला असता, बँका लुटल्या असत्या तर सैरव दास यांना पीआयटी क्लिअरन्स देण्यात आलं असतं, असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले दिपके?
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अशा प्रतिष्ठित विद्यापीठात सैरव दास यांना बोलवण्यात आलं होतं. लेक्चर देण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. ज्या पद्धतीने भारतामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं आणि आपण शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यात यशस्वी ठरलो, त्यावर बोलण्यासाठी सैरव दास यांना या विद्यापीठाने बोलावलं होतं. पण काल रात्री जेव्हा ते तिथे गेले तेव्हा तिथे त्यांना अडवण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही इंडियाच्या बाहेर जावू शकत नाहीत. आता सैरव दास यांना भारताच्या बाहेर न जाऊ देण्याचं कारण काय? एक भारतीय नागरिक विदेशात जाऊ नाही शकत का? सैरव दास हे काय कुठले क्रिमिनल आहेत की त्यांनी कोणत्या बँका लुटल्यात? त्यामुळे तुम्ही त्यांना बाहेर जाऊ देत नाही आहात? असा सवाल यावेळी अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला आहे.
सैरव दास यांची सगळ्यात मोठी चुक ही झाली की त्यांनी कोणताही स्कॅम केलेला नाहीये. जर सैरभ दास यांनी एखादा मोठा स्कॅम केला असता, लोकांना चुना लावला असता, बँका लुटल्या असत्या तर सौरव दास यांना पीआयटी क्लिअरन्स देण्यात आलं असतं. जसं विजय माल्याला देण्यात आलं होतं. हजारो कोटींचा घोटाळा करणारा विजय माल्या हा विदेशात पळून जातो. त्याला मोदी सरकार अडवत नाही. आजही विजय माल्याकडे सात हजार कोटी रुपयांचं कर्ज बाकी आहे. सौरवची ही चुकी आहे, की त्यांनी विजय माल्यासारखा देशाला चुना लावला नाही, त्यामुळे त्याला अडवण्यात आलं, दुसरा निरव मोदी याने पण पीएनबी बँकेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला त्यालाही अडवलं नाही. त्याला मस्त व्हिआयपी ट्रिटमेंट देऊन देशातून बाहेर पाठवण्यात आलं. जर सौरव दास यांनी देखील एखादी बँक लुटली असतील तर सरकारने त्यांना देखील व्हिआयपी ट्रिटमेंट देऊन परदेशात पाठवलं असतं, असं दिपके यांनी म्हटलं आहे.
