AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वस्तामध्ये घर घेण्याची संधी; बँक ऑफ बडोदाकडून थकबाकीदारांच्या संपत्तीचा लिलाव, जाणून घ्या कसे होता येईल लिलावामध्ये सहभागी

आपण जर घर खरेदी करू इच्छित असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे, ज्यांना आपल्या हक्काचे घर घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी बँक ऑफ बडोदाकडून एक चांगली ऑफर आहे. बँकेचे जे थकीत कर्जदार आहेत, त्यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

स्वस्तामध्ये घर घेण्याची संधी; बँक ऑफ बडोदाकडून थकबाकीदारांच्या संपत्तीचा लिलाव, जाणून घ्या कसे होता येईल लिलावामध्ये सहभागी
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 12:41 PM
Share

नवी दिल्ली – आपण जर घर खरेदी करू इच्छित असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे, ज्यांना आपल्या हक्काचे घर घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी बँक ऑफ बडोदाकडून एक चांगली ऑफर आहे. बँकेचे जे थकीत कर्जदार आहेत, त्यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. या लिलावाच्या बोली प्रक्रियेमध्ये आपल्याला देखील सहभागी होता येणार आहे. याबाबत बँक प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.

बँकेने म्हटले आहे की, ज्या ग्राहकांनी संपत्ती तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेतले आणि परत भरलेच नाही, त्यांच्या तारण ठेवण्यात आलेल्या घर, दुकान आणि इतर स्थावर मालमत्तेचा बँकेच्या वतीने लिलाव करण्यात येणार आहे. मिळालेल्या पैशांमधून बँकेच्या कर्जाची भरपाई करण्यात येणार आहे. या लिलाव प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे.

लिलावात कसे सहभागी व्हाल?

या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला किंवा बिल्डरला ई- ई बीके रे या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या पोर्टवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ असा एक पर्याय आहे. त्यावर क्लिक करून तिथे विचारण्यात आलेली सर्व आवश्यक माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीला बँकेच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल. दरम्यान या पोर्टलवर जावून रजिस्ट्रेशन केल्यानंतर संबंधित व्यक्तीला लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारे केवायसी कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे. ही सर्व कागदपत्रे बँकेकडून व्हेरिफाय झाल्यानंतर तो या लिलावामध्ये भाग घेऊ शकतो.

अनेक बँकां करतात ग्राहकांच्या संपत्तीचा लिलाव 

दरम्यान बँक ऑफ बडोदाप्रमाणाचे इतर अनेक बँका देखील लिलाव प्रक्रिया राबवत असतात. एखाद्या व्यक्तीने आपली संपत्ती तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि काही कारणामुळे त्याला ते द्यायला जमले नाही, अथवा त्याने बँकेचे कर्ज बुडवले तर अशा व्यक्तीची संपत्ती बँकेकडून जप्त केली जाते. दरम्यान जप्त केलेली ही संपत्ती बँक नंतर लिलावामध्ये विकते.

संबंधित बातम्या 

Bank Holidays: ‘या’ सहा दिवशी बँकांना सुट्टी; चला, तातडीचे आर्थिक व्यवहार लवकर करा!

Bank Holidays: ‘या’ सहा दिवशी बँकांना सुट्टी; चला, तातडीचे आर्थिक व्यवहार लवकर करा!

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.