Bank Holidays: ‘या’ सहा दिवशी बँकांना सुट्टी; चला, तातडीचे आर्थिक व्यवहार लवकर करा!

बँका बंद असल्यामुळे अनेक एटीएमवरही परिणाम होऊ शकतो. चेक वटण्यातही अडचणी येऊ शकता. अनेक ग्राहकांचे KYC चे काम झाले नसेल, तर ते रखडू शकते.

Bank Holidays: 'या' सहा दिवशी बँकांना सुट्टी; चला, तातडीचे आर्थिक व्यवहार लवकर करा!
संग्रहित छायाचित्र.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Nov 16, 2021 | 11:47 AM

नाशिकः  ग्राहकांनो तुमचे काही तातडीचे आर्थिक व्यवहार असतील, तर ते लवकर करा. कारण नोव्हेंबरच्या उत्तरार्धात बँकाना चक्क सहा दिवस सुट्टी राहणार आहे. नुकतीच दिवाळी संपली. या काळातही भाऊबीज ते कुठे छट पूजापर्यंत अनेक सुट्ट्या आल्या. त्यात कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या. त्यामुळे तब्बल 11 दिवस बँकांचे कामकाज बंद राहिले. त्यात दिवाळीमुळे अनेक कर्मचारी रजेवर. हे सारे सुरू असल्याने अनेक जणांचे बँकांचे व्यवहार तुंबले. अनेक ग्राहकांनी या सुट्ट्यांमुळे आपले व्यवहार पुढे ढकलेले. मात्र, आता अजून सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे बँकेतील आर्थिक व्यवहार वेळेत पूर्ण होतायत की नाही, हे आवश्य जाणून घ्या. अन्यथा तुमची गोची होऊ शकते.

या दिवशी बँका बंद

19 नोव्हेंबरः गुरुनानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमा आहे. त्यामुळे आइजोल, बेलापूर, भोपाळ, चंदीगढ, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगरमधील बँका बंद राहतील. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बँका बंद राहतील.
21 नोव्हेंबरः या दिवशी रविवार आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी असेल.
22 नोव्हेंबरः कणकदास जयंती आहे. त्यामुळे बेंगळुरूत बँक बंद असेल. त्यांची शाखा महाराष्ट्रात असेल, तर तीही बंद राहील.
23 नोव्हेंबरः या दिवशी विशेषतः शिलाँगमधील बँका बंद राहतील. सेंग कुट्सनेमनिमित्त बँकांना सुट्टी राहील. त्यांची शाखा महाराष्ट्रात असेल, तर ती बंद असेल.
28 नोव्हेंबरः या दिवशी रविवार आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी असेल.

या कामांचा होईल खोळंबा

बँका बंद असल्यामुळे अनेक एटीएमवरही परिणाम होऊ शकतो. पैसे संपले, तर ते त्या काळात एटीएममध्ये टाकले जातीलच, याची शक्यता धुसर असते. सोबतच चेक वटण्यातही अडचणी येऊ शकता. अनेक ग्राहकांचे KYC चे काम झाले नसेल, तर ते रखडू शकते. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या खात्यावर अवकाळी नुकसानीचे पैसे जमा होत आहेत. ते पैस काढण्यात, जमा होण्यात थोडाफार उशीर होऊ शकतो. त्यामुळे हे सारे धोके लक्षात घेता, ग्राहकांना आपले व्यवहार लवकर उरकण्याची गरज आहे.

इतर बातम्याः

प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान; कारवाई करून विषय संपवा, मुंबईच्या महापौरांची मागणी

ते मानानं मोठे, पण त्यांनी काहीही सूचवावं हे चालणार नाही; अभिनेते गोखलेंच्या वक्तव्यावर पेडणेकरांचे शेलके ताशेरे

नाशिककरांनो आत्ताच सावध व्हा, ध्वनीप्रदूषणात शहर राज्यात टॉप 10 मध्ये, स्तर चक्क 75.2 डेसीबलवर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें