AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचं संकट, 11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट; तुमच्याकडे सरी बरसणार का?

शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे 24 फेब्रुवारी रोजी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Rain Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचं संकट, 11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट; तुमच्याकडे सरी बरसणार का?
maharashtra rain updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 23, 2026 | 7:53 PM
Share

Maharashtra IMD Weather Update : गेल्या काही दिवसांपासून हवामानात काहीसा बदल जाणवत आहे. वातावरणातील गारवा नाहीसा होऊन आता तापमानात वाढ होताना दिसत आहे. वातावरणात गरमी जाणवत असताना आता पुन्हा एकदा तापमानात घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील इतरही काही राज्यांत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवत असताना महाराष्ट्रातील एकूण 11 जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी रात्रीपासून वातावरणात बदल झालेला पाहायला मिळत आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांत होणार मुसळधार पाऊस?

हवामान विभागाने 23 तसेच 24 फ्रेब्रुवारी अशा दोन दिवसात राज्यात अने ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या शक्यतेनुसार 23 तारखेला मराठवाडा, विदर्भ तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी पासवाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या. आता 24 फेब्रुवारी रोजीदेखील राज्यातील सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सातूर, धाराशीव, चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

तज्ज्ञांच्या मतानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीतून येत असलेल्या आर्द्रतेमुळे तसेच स्थानिक पातळीवर वाढलेल्या तापमानामुळे पावसाचे ढग तयार होत आहेत. यातूनच पाऊस बरसतो आहे. या अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कांदा, गहू तसेच रबी पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. राज्यात अनेक ठिकाणी पीक काढणी चालू आहे, असे असताना अवकाळी पाऊस आल्याने मोठा फटका बसू शकतो. त्यामुळेच हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी?

दरम्यान, पावसाची ही शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली असेल तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. कापलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून जाणार नाही, याची काळजी घ्यावी. या अवकाळी पावसामुळे आता इतर दैनंदिन कामांतही अडथळा निर्माम होऊ शकतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...