प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान; कारवाई करून विषय संपवा, मुंबईच्या महापौरांची मागणी

‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ या कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा सोमवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खरमरीत समाचार घेतला.

प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान; कारवाई करून विषय संपवा, मुंबईच्या महापौरांची मागणी
कंगना राणावत आणि किशोरी पेडणेकर.
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 4:11 PM

मुंबईः ‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ या कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा सोमवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खरमरीत समाचार घेतला. प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री पुरस्कार देणे हा अखंड हिंदुस्थानचा अपमान आहे. तिच्यावर कारवाई करून विषय संपवा, अशी मागणी करत त्यांनी एकाचवेळी कंगना राणावत आणि केंद्र सरकारवर शरसंधान साधले. कंगना दर तीन महिन्यांनी प्रसिद्धीच्या झोतात यायला बघते. ती जन्मली कुठे, रोजीरोटी कमवायला येथे कुठे आणि येथे येऊन माझ्या मुंबईची आणि महाराष्ट्राची पाकिस्तानशी बरोबरी काय करते, अशा शब्दांत त्यांनी कंगनाला फटकारले. सोबतच बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण करावे असा प्रस्ताव आहे. त्याच्यावर आणि त्यामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्यावर आम्ही नक्कीच सकारात्मक विचार करू, असे आश्वासनही दिले.

हिच्यात काय टॅलेंट बघितलं?

किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी खरमरीत टीका केली. त्या म्हणाल्या, आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं ते एका समाजाचे नव्हते. सर्व जाती-धर्माचे होते. कंगनाचे बेताल वक्तव्य म्हणजे या साऱ्या आहुती दिलेल्या लोकांचा अपमान आहे. आपल्या देशात अनेक लोक आहेत. ते अतिशय चांगलं काम करतात. मात्र, हिच्यात काय टॅलेंट बघून पद्मश्री पुरस्कार दिला, हे मला समजत नाही. अशा नटीला पद्मश्री देणे हा अखंड हिंदुस्तानचा अपमान आहे.

अशा बेताल मुलीवर लक्ष द्या

महापौर पेडणेकर म्हणाल्या, कंगनाचा राजकीय, अराजकीय, सामाजिक सर्व स्तरातून निषेध होत आहे. माझी गृह राज्य विभागाला हात जोडून विनंती आहे की, त्यांनी अशा बेताल मुलीवर लक्ष द्यावे. जी संपूर्ण संपूर्ण हिंदुस्थानचा अपमान करते. सर्व लोकांमध्ये फूट पाडते. ती नको त्या विषयात उगीच ढवळाढवळ करत असेल आणि आमच्या हुतात्म्यांचा अपमान करत असेल तर तिचा निषेध आपल्याया न्यायिक बाजूनं करावा लागेल. तिच्यावर कारवाई करून विषय संपवून टाकावा.

त्यांनी काहीही बोलू नये

पेडणेकर यांनी विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर बोलणे टाळले. त्या म्हणाल्या, अनेक बुद्धिजीवी आहेत. ते जसे म्हणतात ना नो कमेंट. तसंच माझंही म्हणणं आहे. हे म्हणणं त्यांना घाबरून नाही. मात्र, काय प्रतिक्रिया देणार. ते मानाने आणि सन्मानाने मोठे आहेत. त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, अशा बुद्धिजीवींनी कुठंही बोलावे, असं चालणार नाही. अटलबिहारी वाजपेयी, आडवाणी, मुंडे अशा अनेक नेत्यांनी आमच्या पक्षासोबत छान काम केलं. आमच्या कामाचा इम्पॅक्ट देशात, मुंबईत दिसला. मात्र, आता कोणीही येणार आणि सूचवणार, असं होणार नाही, असं म्हणत त्यांनी गोखले यांनी केलेल्या शिवसेना-भाजप युती भाष्यावर ताशेरे ओढले.

इतर बातम्याः

शेतकऱ्यांसाठी विशेष टास्क फोर्स, 1 हजार प्रकल्पांना देणार मान्यता, कृषिमंत्री भुसे यांची नाशिकमध्ये घोषणा; असा होणार फायदा

विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.