खात्यात नाही दमडी, तरी काढू शकता 10000 रुपये,मोदी सरकारची जबरदस्त योजना
ओव्हरड्राफ्ट म्हणजे या अंतर्गत बँक आपल्या खातेधारकांना खात्यात जमा रकमेहून अधिक पैसे काढण्याची परवानगी देते.

PM Jan Dhan Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात अनेक खास योजना सुरु केल्या होता. यातील एक मोठी योजना पंतप्रधान जनधन (PMJDY) सुरु केली होती. या योजनेंतर्गत यात केवळ बँकेत खाती उघडली जात नाहीत तर याच खास सुविधाही मिळतात. यातील एक सुविधा ओव्हरड्राफ्टची देखील आहे.
ओव्हरड्राफ्ट काय आहे, खातेधारकांची लिमिट काय ?
ओव्हरड्राफ्टचा विचार करायचा झाला तर याच्या अंतर्गत बँक आपल्या खातेधारकांना खात्या जमा रकमेपेक्षा जास्त पैसे काढण्याची मंजूरी देत असतो. पंतप्रधान जन धन योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका पात्र खातेधारकाला १० हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे. जर खात्यात झिरो बॅलन्स असले तरी देखील पात्र खातेधारक या सुविधे अंतर्गत १० हजार रुपयांचा वापर करु शकतो.
कोणाला मिळणार लाभ ?
पंतप्रधान जनधन योजनेचे खातेधारक या सुविधाचा लाभ खात्याच्या योग्य प्रकारे सहा महिने संचलन पूर्ण झाल्यानंतर घेऊ शकतात. म्हणजे योग्य प्रकारे सहा महिने खाते चालवले तर खातधारक ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, या योजनेसाठी निर्धारित पात्रता मानदंडांना पूर्ण करणे गरजेचे आहेत.
पंतप्रधान जनधन खाते उघडण्यासाठी आवश्यत कागदपत्रात आधारकार्डचा समावेश आहे. याशिवाय आयडी प्रुफमध्ये व्होटर आयडी, पॅन कार्ड वा रेशन कार्डपैकी एक असणे गरजेचे आहे. स्थायी पत्त्याचा पुरावा देखील असावा. यात पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, वीज, टेलिफोन वा पाण्याचे बिल चालेल. पासपोर्ट साईजचा फोटो, योग्य प्रकारे भरलेला जनधन खात्याचा फॉर्म देखील गरजेचा आहे.
खाते कोण उघडू शकतो?
पंतप्रधान जनधन योजना कोणत्याही भारतीयाला खाते उघडता येते.ज्यालोकांकडे आधीचे कोणतेही बँक खाते नाही. त्यांच्या साठी पायभूत बचत खाते खोलले जाऊ शकते. या खात्या किमान बॅलन्स ठेवण्याचे बंधन नाही. इच्छुक व्यक्ती बँक शाखा वा बिझनस प्रतिनिधी , बँक मित्र वा आऊंटलेटवर जाऊन खाते उघडू शकता. यासाठी जरुरी केवायसी कागदपत्रांसह अर्ज जमा करणे बंधनकार असते. दस्ताऐवजाचे सत्यापन केल्यानंतर बँक खाते सक्रिय करते.या योजनंतर्गत जॉईट अकाऊंट खोलण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
बचत बँक खात्यांवर लागू व्याजदर पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांवरही लागू असते. हे खाते प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी), पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएम-जेजेबीवाय), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएम-एसबीवाय), अटल पेन्शन योजना (एपीवाय), मायक्रो यूनिट डेव्हलपमेंट एंड रिफाइनन्स एजन्सी बँक (मुद्रा) योजनेसाठी पात्र आहे.