पेटीएम पेमेंट्स बँक RBI च्या रडारवर! नवीन ग्राहक नोंदणीला बंदी; अर्थजगतात खळबळ

| Updated on: Mar 11, 2022 | 6:31 PM

रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्सला नवीन ग्राहकांची नोंदणी करण्यास बंदी घातली आहे. रिझर्व्ह बँकेला पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत चिंताजनक माहिती समोर आल्यानं बँकंन हा आदेश जारी केला आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक RBI च्या रडारवर! नवीन ग्राहक नोंदणीला बंदी; अर्थजगतात खळबळ
पेटीएम बँक संदर्भातली मोठी बातमी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : डिजिटल बँकिंग व्यवहारांत (Digital Banking) आघाडीची पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) रिझर्व्ह बँकेच्या रडारवर आली आहे. रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्सला नवीन ग्राहकांची नोंदणी करण्यास बंदी घातली आहे. रिझर्व्ह बँकेला पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत चिंताजनक माहिती समोर आल्यानं बँकंन हा आदेश जारी केला आहे. पेटीएम पेमेंट्सला आयटी सिस्टीमचे तातडीनं ऑडिट करण्याच्या सूचना देखील जारी केल्या आहेत. नव्या आयटी फर्म द्वारे पेटीएम पेमेंट्स बँकेचं आयटी ऑडिट केलं जाणार आहे. रिझर्व्ह बँकेला अहवाल सादर केल्यानंतर पेटीएम पेमेंट्सच पुढील भविष्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) तत्काळ प्रभावानं निर्णय लागू केल्यामुळं अर्थजगतात खळबळ माजली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डिजिटल बँकिंग यंत्रणेतील व्यवहारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पेटीएमचा विस्तार वाढता वाढे..

पेटीएम पेमेंट्स बँक ही जानेवारी महिन्यामध्ये 926 मिलियन्सहून अधिक यूपीआय व्यवहारांचा टप्पा पार करणारी पहिली बँक ठरली होती. भारतात सर्वाधिक वेगाने विस्तारणारणाऱ्या यूपीआय बेनिफिशिअरी बँकेत (UPI beneficiary bank) पेटीएम पेमेंट्स समावेश झाला होता. पेटीएम पेमेंट्स वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

‘या’ सेवेसाठी पेटीएमवर उड्या:

सर्वोत्तम तंत्रज्ञान, सुसज्ज पायाभूत यंत्रणा आणि उच्च दर्जाचा डिजिटल बँकिंग अनुभव यांच्या जोरावर पेटीएमनं विस्ताराचा धडाका लावला आहे. ग्राहकांना अतिशय वेगवान यूपीआय मनी ट्रान्सफर सेवा आणि दैनंदिन पेमेंट्ससाठी पेटीएम वॉलेट आणि बँकखाते वापरण्याची सुविधा पेटीएम पेमेंट्स बँकेमार्फत पुरविली जाते.

पेटीएम ट्रान्झिट कार्ड

पेटीएम पेमेंट्स बँकेने अलीकडेच पेटीएम ट्रान्झिट कार्डही ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे. हे एनसीएमसी म्हणजे भारतीयांना एकाच कार्डामध्ये आपल्या प्रवासाशी संबंधित सर्व व्यवहार करण्याची सुविधा देऊ करते. हे कार्ड उपलब्ध झाल्याने आता यूजर्सना वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी कार्डस् जवळ बाळगण्याची गरज उरणार नाही आणि आपल्या सर्व पेमेंटसाठी फक्त पेटीएम ट्रान्झिट कार्ड वापरणे पुरेसे ठरेल.

संबंधित बातम्या :

Share Market : शेअर्स बाजारात तेजीचा चौकार, सेन्सेक्स 86 अंकांनी वधारला; फार्माची बाजी

कोरोनाचा प्रभाव वसरला; सोन्याची विक्रमी आयात, 2021 मध्ये 27 टक्क्यांची वाढ

पाच राज्यातील विधानसभा निकालानंतर इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव