Gold Rate : सोन्यात करायची गुंतवणूक पण बजेट नाही? मग हे आहेत बेस्ट पर्याय

Best Gold Investment Options : आता सोने खरेदी करण्याइतपतच सोन्यातील गुंतवणूक मर्यादीत नाही. तर SGBs, ETFs, डिजिटल गोल्ड वा म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून गुंतवणुकीचा फायदा घेता येईल. त्यातून जोरदार परतावा मिळेल.

Gold Rate : सोन्यात करायची गुंतवणूक पण बजेट नाही? मग हे आहेत बेस्ट पर्याय
सोन्यातील गुंतवणूक
| Updated on: Sep 27, 2025 | 4:42 PM

देशात सोने हे कित्येक वर्षांपासून सुरक्षित गुंतवणूक (gold investment) मानल्या जाते. सोने असणे ही सुरक्षिततेची भावना पण आहे. गेल्या काही वर्षात सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोने यंदा तर लाखाच्या पुढे पोहचले आहे. सध्याच्या किंमती पाहता सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सोन्याच्या किंमती कितीही वधारल्या तरीही तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळेलच. पण फिजिकल सोने सुद्धा खरेदी करता येईल. त्यासाठी मोठी रक्कम खर्च करण्याची गरज नाही. छोट्या छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही तुमचा गोल्ड पोर्टफोलिओ वाढवू शकाल.

सोन्याची इतकी क्रेझ का?

केवळ महिला वर्गच नाही तर अनेक देशाच्या केंद्रीय वा मध्यवर्ती बँका सोन्याची मोठी खरेदी करतात. सोने हे आर्थिक अनिश्चितता, महागाई आणि चलनातील चढउतारापासून वाचवते. भारतात तर सणासुदीत आणि समारंभात, लग्न कार्यात लग्नाचे दागिने घालून मुरडण्याची एक वेगळीच हौस आहे. पण फिजिकल सोने सांभाळणे, वागवणे आणि ते घरात सुरक्षीत ठेवणे जिकरीचे आहे. त्यापेक्षा हा पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

1- गोल्ड ईटीएफ

शेअर बाजाराप्रमाणेच सोने खरेदी करता येते. या सुविधेला Gold ETF असे म्हणतात. हा एक्सचेंज-ट्रेडेड फंड असतो. हा फंड स्टॉक एक्सचेंजवर खरेदी आणि विक्री करता येतो. सोन्याच्या सध्याच्या किंमतीच्या जवळपास गोल्ड ईटीएफ खरेदी करता येते. गोल्ड ईटीएफचे बेंचमार्क स्पॉट भाव आहे. यासाठी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे.

2- डिजिटल सोने

डिजिटल गोल्ड हे सॉलिड गोल्ड आणि पेपर गोल्ड यांचे मिश्रण आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अॅप्सने डिजिटल सोन्याचा पर्याय समोर आणला आहे. यामध्ये अगदी 100 रुपये अथवा त्या पटीत गुंतवणूक करता येते. डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला सोने खरेदी-विक्रीची सुविधा मिळते. गुगल पे, पेटीएम, फोनपे यासारख्या अॅप्सच्या माध्यमातून सोने खरेदी करता येते.

3- सॉवरेन गोल्ड बाँड

सॉवरेन गोल्ड बाँड हा सरकारने उपलब्ध करुन दिलेला पर्याय आहे. केंद्र सरकार वेळोवेळी असा पर्याय घेऊन येते. सार्वभौम सुवर्ण रोख्यावर दरवर्षी 2.50% निश्चित व्याज मिळते. गुंतवणुकीसाठी डी-मॅट खात्याची गरज आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड आणले होते. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. सरकार याची घोषणा करते. सोनं खरेदीत काही सवलत पण देते.