AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय असतं Masked Aadhaar Card, जाणून घ्या फायदे?

मास्क्ड आधार कार्ड म्हणजे ई-आधार कार्ड ज्यामध्ये 12 अंकी क्रमांकाऐवजी केवळ शेवटचे 4 क्रमांक दिसतात. आधार कार्ड डेटा लीक झाल्याच्या बातमीनंतर यूआयडीएआयने मास्क्ड आधारची कन्सेप्ट सुरू केली, जी नियमितपेक्षा अधिक सुरक्षित आहे. | Aadhaar card

काय असतं Masked Aadhaar Card, जाणून घ्या फायदे?
डिजिटल आधार: एकाच अ‍ॅपमध्ये पाच प्रोफाईल लिंक
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 16, 2021 | 11:52 AM
Share

मुंबई: सध्याच्या काळात अगदी सीमकार्ड, रेशनकार्डपासून ते जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आधारकार्ड ही अनिवार्य गोष्ट आहे. त्यामुळे आधार कार्ड गहाळ झाल्यास किंवा जुने झाल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जुने झाल्यामुळे आधार कार्डावरची माहिती पुसट होते. त्यामुळे आधार कार्ड ग्राह्य धरले जाईल किंवा नाही, याची शाश्वती नसते. हा धोका टाळण्यासाठी तुम्ही मास्क्ड आधार कार्डाचा वापर करु शकता.

मास्क्ड आधार कार्ड काय आहे?

मास्क्ड आधार कार्ड म्हणजे ई-आधार कार्ड ज्यामध्ये 12 अंकी क्रमांकाऐवजी केवळ शेवटचे 4 क्रमांक दिसतात. आधार कार्ड डेटा लीक झाल्याच्या बातमीनंतर यूआयडीएआयने मास्क्ड आधारची कन्सेप्ट सुरू केली, जी नियमितपेक्षा अधिक सुरक्षित आहे. हे मिळवणे खूप सोपे आहे आणि यूआयडीएआय वेबसाइटवर जाऊन काही आवश्यक माहिती देऊन सहज डाउनलोड केले जाऊ शकते. eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर लॉगइन करुन तुम्ही नियमित आणि मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करु शकता.

आधार कार्ड डाऊनलोड कसे कराल?

* सर्वप्रथम eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर जा. * संकेतस्थळावर गेल्यानंतर आपला 12 अंकी आधार क्रमांक टाका. * तुम्हाला मास्क्ड आधार कार्ड हवे असल्यास तसा पर्याय निवडावा. * स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाईप करावा. * त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी स्क्रीनवर टाकून सबमिट करावा. * ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आधार कार्डाचा तपशील आणि डाऊनलोड करण्याचे पर्याय दिसतील.

आधार कार्डाची पडताळणी कशी कराल?

* सर्वप्रथम uidai.gov.in/verify या थेट लिंकवर लॉगिन करा. * पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. * त्यानंतर कॅप्चा कोड टाका. * यानंतर व्हेरिफाई बटणावर क्लिक करा. * तुमचा आधार क्रमांक योग्य असल्याचा एक मेसेज पेजवर डिस्प्ले होईल. त्यामध्ये नमूद केलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी करुन घ्या. * याशिवाय, तुमचा खासगी तपशीलही या पेजवर दिसेल.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

संबंधित बातम्या:

फक्त एका क्लिकवर डाऊनलोड करा नवं आधारकार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तुमचं आधार कार्ड बनावट आहे का? एका मिनिटात तपासून पाहा

आधार कार्डावरील फोटो आवडला नाही, बदलण्यासाठी काय कराल, जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...