आधार कार्डावरील फोटो आवडला नाही, बदलण्यासाठी काय कराल, जाणून घ्या सर्वकाही

Aadhaar card photo | आधार कार्डावरील मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, ई-मेल, पत्ता आणि छायाचित्र करण्यासाठी कोणतीही ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला आधार कार्डावरील छायाचित्र बदलायचे असल्यास प्रत्यक्ष आधार केंद्रावर जावे लागेल. टपाल कार्यालयातही ही सुविधा उपलब्ध आहे.

आधार कार्डावरील फोटो आवडला नाही, बदलण्यासाठी काय कराल, जाणून घ्या सर्वकाही
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Oct 03, 2021 | 7:25 AM

नवी दिल्ली: सरकारी ओळखपत्रांवरील व्यक्तींची छायाचित्र हा नेहमीच थट्टेचा विषय असतो. त्यामध्ये आधर कार्डवरील अनेकांची छायाचित्र दाखवायच्याही लायकीची नसतात. आधार कार्डासाठी बऱ्याचदा सरकारी केंद्रांवर साध्या वेबकॅमच्या साहाय्याने छायाचित्र काढले जाते. तेव्हा छायाचित्राच्या दर्जाविषयी फारशी काळजी घेतली जात नाही. निव्वळ एक उपचार म्हणून ही छायाचित्र काढली जातात. त्यामुळे ही आधार कार्डावरील ही कायमस्वरुपी ‘ओळख’ जवळपास विद्रूप असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, आता तुम्हाला आधार कार्डावरील स्वत:चे छायाचित्र बदलण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीकडून (UIDAI) उपलब्ध करुन देण्यात आलेल्या या सुविधेमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. आधार कार्डावरील मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, ई-मेल, पत्ता आणि छायाचित्र करण्यासाठी कोणतीही ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला आधार कार्डावरील छायाचित्र बदलायचे असल्यास प्रत्यक्ष आधार केंद्रावर जावे लागेल. टपाल कार्यालयातही ही सुविधा उपलब्ध आहे.

आधार कार्डावरील छायाचित्र बदलण्यासाठी काय कराल?

* सर्वप्रथम uidai.gov.in वर लॉग इन करा आणि आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करा. * हा आधार नोंदणी फॉर्म तुम्हाला नजीकच्या आधार केंद्रावर जमा करावा लागेल. * याठिकाणी तुमचे बायोमेट्रिक डिटेल घेतले जातील. * त्यानंतर आधार कर्मचारी तुमचा नवा फोटो काढेल. * फोटो अपडेट करण्यासाठी तुमच्याकडून 25 रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाईल. * त्यानंतर तुम्हाला यूआरएन क्रमांकासोबत एक स्लीप दिली जाईल. * यूआरएन क्रमांकाचा वापर करुन तुम्ही आधार कार्डावरील फोटो बदलला की नाही, हे तपासू शकता. * फोटो बदलल्यानंतर तुम्ही UIDAI च्या संकेतस्थळावरुन नवे आधारकार्ड डाऊनलोड करु शकता.

आधारकार्ड खरे किंवा खोटे आहे हे कसे ओळखाल?

* सर्वप्रथम uidai.gov.in/verify या थेट लिंकवर लॉगिन करा. * पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. * त्यानंतर कॅप्चा कोड टाका. * यानंतर व्हेरिफाई बटणावर क्लिक करा. * तुमचा आधार क्रमांक योग्य असल्याचा एक मेसेज पेजवर डिस्प्ले होईल. त्यामध्ये नमूद केलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी करुन घ्या. * याशिवाय, तुमचा खासगी तपशीलही या पेजवर दिसेल.

मास्क्ड आधारकार्ड म्हणजे काय?

eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर लॉगइन करुन तुम्ही नियमित आणि मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करु शकता. मास्क्ड आधार कार्डावर केवळ शेवटचे चार क्रमांक दिसतात. तुम्ही हव्या त्या प्रकारे आधारकार्ड डाऊनलोड करु शकता.

इतर बातम्या : 

महागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय?

लाखभर पगार असूनही बचत शून्य, जाणून घ्या गुंतवणूकीच्या सोप्या टिप्स

मॅनेजमेंट बदलताच ‘या’ कंपनीचे शेअर होल्डर्स मालामाल, एका शेअरची किंमत 100 रुपयांहून कमी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें