
सोन्याचे दर सध्या आभाळाला भिडलेले आहेत. सोन्याच्या धातूला सर्वात अमुल्य मानले जाते. सोने असणे म्हणजे ती व्यक्ती श्रीमंत असणे हे समीकरण प्राचीन काळापासून आहे. सोने केवळ दागिन्यांच्या रुपात नव्हे तर सोन्याचा साठा हा देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. डिजिटल करन्सीच्या काळात सोने सुरक्षा, स्थिरता आणि धनाचे प्रतिक म्हणून आज देखील जास्त महत्वाचे आहे.मग प्रश्न निर्माण होतो की कोणत्या देशाकडे सर्वाधिक सोने आहे.
ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या ताज्या रिपोर्टनुसार संयुक्त राज्य अमेरिकेकडे (USA) सप्टेंबर २०२५ पर्यंत ८,१३३ टन सोने आहे. वास्तविक अमेरिका अनेक वर्षांपासून सोन्याचे सर्वात मोठे भंडार असलेला देश आहे. आणि साल २००० पासून जवळपासून अमेरिकेच्या सोन्याचा साठा स्थिर आहे.त्यामुळे या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचा नंबर आहे. युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला जर्मनीकडे ३,३५० टन सोने आहे.जे साल २००० मध्ये ३,४६८ टन होते. यामुळे जर्मनी जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सोने असलेला देश आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इटलीचा नंबर आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत या युरोपीय देशाकडे २,४५२ टन सोने आहे.भारताचा खास दोस्त फ्रान्सकडे सध्या २,४३७ टन सोने आहे.त्यामुळे जगात फ्रान्स सोन्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचा सर्वात मोठा मित्र देश रशियाकडे २,३३० टन सोने आहे. रशिया त्यामुळे या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. हे आकडे सप्टेंबर २०२५ चे आहेत.
भारताचा शेजारील देश चीनकडे २,३०४ टन सोने आहे. याआधी चीनकडे २,२९९ टन सोने होते. म्हणजे हे स्पष्ट आहे की चीन हळूहळू आपला सोन्याचा साठा वाढवत आहे. सर्वात जास्त सोने बाळगणाऱ्या देशाच्या यादीत चीनचा सहावा क्रमांक आहे. युरोपातील छोटा देश स्वित्झर्लंडकेड सध्याच्या काळात १,०४० टन सोने आहे. तसेच भारताचे बोलायचे झाले तर सध्या भारताकडे ८८० टन सोने आहे, जे आतापर्यंतचे सर्वाधिक सोने आहे. भारत सोन्याच्या बाबतीत ८ वा देश आहे. भारताचा मित्र जपानकडे ८४६ टन सोने आहे. जपान या यादीत नवव्या क्रमांकावर आहे.