AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Mallya: आता झुरळ होऊ का? विजय माल्या यांना का व्हायचंय कॉक्रोच? पळपुटा म्हटल्यानं का झोंबल्या मिरच्या?

Vijay Mallya On Cockroach: किंगफिशर हा ब्रँड अजूनही अनेकजण विसरले नाहीत. त्याचे अनभिषिक्त सम्राट विजय माल्याला आता कॉक्रोची आठवण झाली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर त्यांनी सुद्धा सूर आळवला आहे. पण तो सामाजिक नाही तर वैयक्तिक आहे.

Vijay Mallya: आता झुरळ होऊ का? विजय माल्या यांना का व्हायचंय कॉक्रोच? पळपुटा म्हटल्यानं का झोंबल्या मिरच्या?
आता झुरळ होऊ का? विजय माल्या यांना म्हणायचं का?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 10, 2026 | 12:50 PM
Share

उद्योजक विजय माल्या यांनी पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात सुरू असलेली कारवाई ही अन्यायकारक असल्याचे भोकाड पसरले आहे. ईडीने त्यांच्याविरोधात कथित 14,131.60 कोटींच्या वसुलीवरून त्यांची आगपाखड सुरू आहे. बँकांना आपण व्याजासहित कर्जाऊ रक्कम परत केली आहे. तरीही आपल्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. आपल्याला पळपुटा म्हटल्या जात असल्याची व्यथा माल्यांनी मांडली. ब्रिटेनमधल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे आपल्याला भारतात परतता येत नसल्याचा दावा त्यांनी केला.

केंद्र सरकारवर अन्याय करत असल्याचा आरोप

विजय माल्या पळपुटे आर्थिक आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यांनी या शब्दावर आक्षेप घेतला आहे. तर केंद्र सरकार आपल्यावर अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे. माल्या सध्या लंडनमध्ये राहत आहेत. बुधवारी रात्री उशीरा त्यांनी सोशल मीडियावर याविषयीच्या सलग काही पोस्ट शेअर केल्या. आपल्याला अन्यायाचा सामना करावा लागत असल्याचे ते म्हणाले.

आता झुरळ होऊ का?

माल्याने सोशल मीडियावर त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. जितके अन्या मी झेलले आहेत आणि आता ही सहन करत आहे. ते पाहता मलाही वाटत आहे की, मी सुद्धा झुरळ व्हायला हवे. कदाचित झुरळ झाल्याने माझे आयुष्य थोडे चांगले होईल, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. अर्थात यातून त्यांना काय ध्वनीत करायचे आहे समोर आले नाही. कॉक्रोच जनता पार्टीसारखे ते आंदोलन करणार की त्यांच्या वाक्याचा दुसरा काही अर्थ आहे, यावरून सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. अनेकांनी माल्यांवर जोरदार फटकेबाजी केली आहे.

14,000 कोटींच्या वसुलीवर माल्यांचा दावा काय?

विजय माल्या यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्राचा दाखला दिला. त्यात ईडीने हे कबूल केले आहे की, त्यांच्याकडून जवळपास 14,000 कोटीहून अधिक रुपयांची वसूली करण्यात आली आहे. 2021 मध्ये ही रक्कम त्या बँकांना परत करण्यात आली, ज्यांची थकबाकी होती, असा दावा त्यांनी केला आहे. आपल्या दाव्यावर ज्यांना विश्वास नाही त्यांनी ईडीचे शपथपत्र एकदा वाचावे असे आवाहन त्यांनी टीकाकारांना केले आहे.

Follow Us
पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप
MIM Protest In Thane | पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप; ठाणे महापालिकेसमोर मडकी फोडत निषेध
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! पर्यावरणपूरक...
CM Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! 6,500 विद्यार्थ्यांसमोर दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं..
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं विधान, काय म्हणाल्या?
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगे
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगेंच्या या वक्तव्याने वेधलं लक्ष
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण...
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण समोर
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क ठोसा...
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क... चकित करणारं कारण समोर
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?