Rupee vs Dollar : ट्रम्प हरल्यानंतर तब्बल 200 दिवसांनी भारताच्या रुपयाने पाहिला सोन्याचा दिवस

गेल्या जवळपास ७ सत्रांत रुपयाने डॉलरच्या तुलनेत १.३१% वाढ नोंदवली आहे. यामुळे कुठे तरी भारताच्या रुपयाला सोन्याचे दिवस आल्याचे दिसून येत आहे.

Rupee vs Dollar : ट्रम्प हरल्यानंतर तब्बल 200 दिवसांनी भारताच्या रुपयाने पाहिला सोन्याचा दिवस
Trumps Defeat Crushes Dollar Dominance
| Updated on: Nov 07, 2026 | 11:31 AM

अमेरिकन डॉलर सर्वात शक्तिशाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया गेले अनेक दिवस खाली होता. पण अखेरीस रुपयाने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. आकडेवारी पाहिल्यास, रुपया ९४ च्या पातळीवरून ९३ च्या पातळीवर मजबूत झाला आहे. या बदल जवळपास २०० दिवसांत दिसून आला नव्हता. विशेष म्हणजे, गेल्या सात सत्रांत रुपया डॉलरच्या तुलनेत १.३१ टक्क्यांनी वधारला आहे. आता अशा प्रश्न पडतो की रुपयाला सोन्याचा दिवस कसा आला. यामागे अनेक कारण आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट, परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली मोठी खरेदी आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला पराभव ही मुख्य कारणं आहेत. याच कारणांमुळे रुपयांमध्ये ही सुधारणा दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात रुपया डॉलरच्या तुलनेत ९० च्या पातळीपर्यंत पोहोचू शकतो.

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत!

शुक्रवारी अमेरिकन चलनासमोर रुपयाने ४३ पैशांची दमदार वाढ नोंदवली गेली असून तो प्रति डॉलर ९३.९८ या पातळीवर बंद झाला. गुंतवणूकदारांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे रुपयामध्ये ही मजबूती दिसून येत आहे. परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (AI) खर्च मंदावण्याची शक्यता यांसारख्या घटकांनीही रुपयाला बळ दिले. आंतरबँक परकीय चलन बाजारात, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९४.५० या पातळीवर उघडला. दिवसाच्या व्यवहारादरम्यान, तो ९३.८२ या उच्चांकी आणि ९४.५० या नीचांकी पातळीपर्यंत पोहोचला होता. अखेरीस, तो ९३.९८ प्रति डॉलर या पातळीवर बंद झाला, जो त्याच्या आधीच्या बंद भावाच्या तुलनेत ४३ पैशांची वाढ दर्शवतो. गुरुवारी, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९४.४१ या पातळीवर बंद झाला होता, ज्यामध्ये पाच पैशांची वाढ झाली होती.

Loading...

बाजाराची स्थिती काय?

दरम्यान, सहा प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची कामगिरी दर्शवणारा ‘डॉलर इंडेक्स’ ०.४९ टक्क्यांनी वाढून १०२.०४ वर पोहोचला.

फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाचा बेंचमार्क असलेल्या ‘ब्रेंट क्रूड’च्या किमतीत २.०४ टक्क्यांची वाढ होऊन ती प्रति बॅरल १००.३० डॉलर्सवर पोहोचली. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) निव्वळ खरेदीदार ठरले; शुक्रवारी त्यांनी एकूण १३,७४९.८२ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

घडामोडीबद्दल तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे?

देशांतर्गत बाजारातील मजबूती आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) वाढलेली गुंतवणूक यामुळे रुपया सकारात्मक कल दर्शवू शकतो. युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव तसेच पश्चिम आशियातील संघर्ष, रुपयाच्या मोठ्या वाढीला मर्यादित ठेवू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us