Elon Musk: “प्रिय, पंतप्रधान अंबानी…”, एकाच दगडात एलॉन मस्क याने अनेक पक्षी केले गार, केंद्र सरकारवर साधला निशाणा

Elon Musk on Mukesh Ambani over Starlink Delay : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क हा सध्या केंद्र सरकारवर नाराज आहे. रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानींच्या आडून त्याने सरकारच्या धोरणावर तिरकस बाण सोडला आहे.

Elon Musk: प्रिय, पंतप्रधान अंबानी…, एकाच दगडात एलॉन मस्क याने अनेक पक्षी केले गार, केंद्र सरकारवर साधला निशाणा
एलॉन मस्क यांची मुकेश अंबानी यांच्यावर टीका
| Updated on: Oct 10, 2026 | 8:47 AM

Elon Musk on Mukesh Ambani: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क याच्या Starlink कंपनीच्या सॅटेलाईट इंटरनेट सेवेला देशात अद्याप परवानगी मिळालेली नाही. भारतीय उद्योगपतींच्या दबावामुळेच मोदी सरकार ही परवानगी देत नसल्याचा आरोप एलॉन मस्क याने केला आहे. आता तर एक पाऊल पुढे टाकत त्याने भारतीय राजकारणात एक बॉम्बगोळा सोडला आहे. त्याने एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात “प्रिय, पंतप्रधान अंबानी…”, असा उल्लेख करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना त्यांची एकाधिकारशाही हवी आहे. त्यामुळेच Starlink कंपनीला भारतात प्रतिस्पर्धी म्हणून संधी नाकारली जात असल्याचा आरोप मस्क यांनी केली. अर्थात केंद्र सरकार आणि केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. अंबानी समूहाची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Loading...

मस्क यांची एक्स पोस्ट चर्चेत

एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे, ‘Dear Prime Minister Ambani’. मला हे उशीरा लक्षात आले की भारताची खरी ताकद अंबानींकडे आहे, असा तिरकस बाण या ट्वीटमधून मस्क याने सोडला आहे. अंबानी यांना त्यांच्या कंपनीचा एकाधिकार असावा हे वाटणे स्वाभाविक आहे. पण ते भारतात Starlink ला प्रतिस्पर्धी कंपनी होण्याची परवानगी देतील का? असा चिमटाही त्यांनी काढला.

मुकेश अंबानी यांच्यावर इतकी नाराजी का?

Starlink गेल्या चार वर्षांपासून भारतात सेवा सुरू करण्याच्या परवानगीच्या प्रक्रियेत अडकली आहे. सध्या भारत आणि अमेरिकेच्या व्यापारी करारावरूनही सूर जुळलेले नाहीत. स्टारलिंकला भारतात लायसन्स मिळाले आहे. पण व्यावसायिक स्तरावर उतरण्यासाठी आवश्यक परवानगी अद्यापही देण्यात आलेली नाही. मस्क यांच्या मते जगातील 165 पेक्षा अधिक देशांनी Starlink ला परवानगी दिली आहे. भारतात नियमांचे पालन केले आहे. जवळपास पाच वर्षांपासून आम्ही भारतात सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण परवानगी देण्यासाठी उशीरा होत आहे. पण या आरोपासाठी मस्क यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही.

मस्क यांच्या आरोपावर सरकारचे उत्तर

मस्क यांच्या या आरोपावर केंद्र सरकारने उत्तर दिले आहे. देशात कोणत्याही क्षेत्रात एकाधिकारशाहीला प्रोत्साहन देण्यात येत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) यांनी दिली. देशात तीन कंपन्यांना उपग्रह दळणवळणासाठी(सॅटेलाईट कम्युनिकेशन) परवाने देण्यात आले आहेत. त्यात स्टारलिंक, जिओ सॅटकॉम आणि युटेलसॅट वनवेब यांचा समावेश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us