अधिकाऱ्यांनी झिडकारलं, मग ठरवलं IAS व्हायचं, लाखाची नोकरी सोडून UPSC मध्ये यश मिळवणारा पठ्ठ्या

| Updated on: Mar 17, 2021 | 1:42 PM

पहिल्या परीक्षेत यश मिळालं नाही तर मेडिकल क्षेत्रात परत जायचं, असं धीरज कुमार सिंह यांनी ठरवलं होतं. IAS Dheeraj Kumar Singh success story

अधिकाऱ्यांनी झिडकारलं, मग ठरवलं IAS व्हायचं, लाखाची नोकरी सोडून UPSC मध्ये यश मिळवणारा पठ्ठ्या
धीरज कुमार सिंह, आयएएस
Follow us on

नवी दिल्ली: भारतात सर्वाधिक प्रतिष्ठेची नोकरी म्हणून आयएएस आणि आयपीएसला पसंती दिली जाते. देशातील लाखो युवक नागरी सेवांच्या परीक्षांची तयारी करतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात. काही विद्यार्थ्यांची परीक्षेतून अधिकारीपदावर निवड होते तर काही जण पुन्हा एकदा परीक्षेच्या तयारीला लागतात. यूपीएससीतून नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी पदावर काम करताना मिळणार सन्मान ही बाब युवकांसाठी प्रेरणादायी ठरते. आपण अशा एका युवकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यानं 2019 मध्ये नागरी सेवा परीक्षेत यश मिळवलं होते. त्या युवकाचं नाव धीरज कुमार सिंह हे आहे. त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली आणि त्यांनी आयएएस व्हायचं ठरवलं. ( IAS Dheeraj Kumar Singh success story how he decided to gave civil services exam)

धीरज कुमार सिहं यांच्या आयुख्यात नेमकं काय घडल?

धीरज कुमार यांच्या कुटुंबाची पार्शवभूमी साधारण होती, तरी देखील त्यांनी शिक्षणात यश मिळवलेलं होते. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमडीचं शिक्षण घेतलं होते. ते बनारसमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत होते आणि त्यांचं कुटुंब दुसऱ्या शहरात राहायला होते. धीरज यांचे वडिल दुसऱ्या शहरामध्ये नोकरी करत होते. धीरजकुमार यांची आई आजारी असायची त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागत असे. धीरज कुमार यांच्या वडिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुसऱ्या शहरामध्ये बदली करण्याची विनंती केली. मात्र, अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव नाकारला. या घटनेनंतर धीरज कुमार यांनी डॉक्टर असून आपली जर ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचं काय होत असेल असा विचार केला. लोकांची मदत करण्यासाठी आयएएस होण्याचा निर्धार धीरज यांनी केला.

आयएएस होण्यासाठी लाखो रुपयांची नोकरी सोडली

धीरज कुमार हे एमबीबीएस झाले होते आणि एमडीचं शिक्षण घेत होते. कुमार यांना त्यावेळी 5 लाखांपर्यंतची कमाई करण्याची संधी होती. मात्र, आयएएस बनण्यासाठी पाच लाख रुपयांची ऑफर धुडकावली. मेडिकल क्षेत्रात करिअर सेट झालेलं असताना धीरज कुमार यांनी आयएएसची तयारी करण्याचं ठरवलं. यावेळी त्यांच्या कुटुंबाला मेडिकलमधील करिअरचं काय होणार, अशी भीती वाटली होती. मात्र, त्यांनी धीरज कुमार यांना पाठिंबा दिला. धीरज कुमार यांनी बंगळुरुमध्ये यूपीएससीच्या परीक्षेची तयारी केली आणि पहिल्या प्रयत्नातच यश मिळवलं.

पहिल्या प्रयत्नात यशाचा झेंडा रोवला

धीरज कुमार यांनी बंगळुरुमध्ये आयएएस परीक्षेची तयारी केली. 2019 ची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. डॉक्टरची नोकरी सोडून धीरज कुमार यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली. पहिल्या परीक्षेत यश मिळालं नाही तर मेडिकल क्षेत्रात परत जायचं असं धीरज कुमार यांनी ठरवलं होतं. मात्र, त्यांनी केलेल्या तयारीमुळे पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले.


संबंधित बातम्या:

पहिला भारतीय आयएएस कोण? ज्यानं इंग्रजांच्या भ्रमाचा भोपळा फोडला

RBI Grade B 2021 Result : ऑफिसर ग्रेड-बीच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर, थेट लिंकद्वारे चेक करा

( IAS Dheeraj Kumar Singh success story how he decided to gave civil services exam)