Indian Air Force Recruitment 2021: भारतीय वायू सेनेत ‘ग्रुप सी’ मधील 82 पदांसाठी भरती

| Updated on: Nov 13, 2021 | 10:51 AM

भारतीय वायू सेनेतील विविध एअर फोर्स स्टेशन आणि यूनिटमधील ग्रुप सी मधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

Indian Air Force Recruitment 2021: भारतीय वायू सेनेत ग्रुप सी मधील  82 पदांसाठी भरती
job
Follow us on

मुंबई:भारतीय वायू सेनेतील विविध एअर फोर्स स्टेशन आणि यूनिटमधील ग्रुप सी मधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. इंडियन एअर फोर्सनं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं 30 दिवसात अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत जाहिरात वाचून घेणं आवश्यक आहे.

पदांचा तपशील

लोअर डिव्हिजनल क्लार्क (12),मल्टी टास्किंग स्टाफ (18), अधीक्षक (1), सिव्हिलीयन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (45), कुक (5), कारपेंटर (1) आणि फायरमन या पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारांना लेव्हल 2 अंतर्गत पगार दिला जाईल.

पात्रता

लोअर डिव्हिजनल क्लार्क पदासाठी 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मल्टी टास्किंग स्टाफ, सिव्हिलीयन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, कुक, कारपेंटर आणि फायरमन या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, अधीक्षक पदासाठी उमेदवार उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, वयोमर्यादा 18 ते 25 दरम्यान असणं आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

भारतीय वायूदलातील  लोअर डिव्हिजनल क्लार्क ,मल्टी टास्किंग स्टाफ , अधीक्षक , सिव्हिलीयन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर , कुक , कारपेंटर आणि फायरमन या पदासाठी निवड लेखी परीक्षा,प्रात्याक्षिक, फिजीकल, स्किल टेस्ट या प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. इंडियन एअर फोर्सकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर उमदेवारांनी अर्ज पाठवून देणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या:

रजा अकादमीवर बंदी घाला, नाही तर आम्ही त्यांना संपवू, महाराष्ट्रातल्या दंगलीवर राणेंचा इशारा

शिवसेनेने कधीही ठरवून मुस्लिमांना विरोध केला नाही, आमच्या हिंदुत्वाच्या व्याखेत सर्व जातीधर्मांना स्थान: संजय राऊत

भाजपाचा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात तुफान खर्च; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती पैसे खर्च

Indian Air Force invited applications for various post check details here