NBCC India Limited Recruitment: आपण विकासावर बोलू, नोकरीवर बोलू ! आम्ही नोकरीची बातमी देतो, तुम्ही अर्ज भरा…

| Updated on: May 22, 2022 | 1:18 PM

अर्जदार शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून 60 टक्के एकूण गुणांसह ही सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवीप्राप्त असावा. शिवाय, उमेदवाराला पीएमसी/ ईपीसी/ रिअल इस्टेट/ इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रातील एकूण सहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

NBCC India Limited Recruitment: आपण विकासावर बोलू, नोकरीवर बोलू ! आम्ही नोकरीची बातमी देतो, तुम्ही अर्ज भरा...
नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती
Image Credit source: NBCC Official Website
Follow us on

नवी दिल्ली : नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडने (NBCC India Limited) 23 रिक्त व्यवस्थापकीय पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड अंतर्गत महाव्यवस्थापक (Engineering), अतिरिक्त महाव्यवस्थापक (विपणन), प्रकल्प व्यवस्थापक (सिव्हिल) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

  • महाव्यवस्थापक (इंजिनीअरिंग)

या प्रवर्गासाठी तब्बल सहा पदे उपलब्ध आहेत. ही वेतनश्रेणी 90,000 ते 2,40,000 रुपयांपर्यंत असू शकते. अर्जदार शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून / समतुल्य संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये (पूर्ण-वेळ) पदवीधर असावा. शिवाय, उमेदवाराला पीएमसी / ईपीसी / रिअल इस्टेट / पायाभूत सुविधा क्षेत्रात सुमारे एकूण 15 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा
  • अतिरिक्त महाव्यवस्थापक (मार्केटिंग)

या प्रवर्गासाठी तब्बल 2 पदे उपलब्ध आहेत. वेतनश्रेणी 80,000 ते 2,20,000 रुपयांपर्यंत असू शकते. अर्जदाराला आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता म्हणजे शासनमान्य विद्यापीठ/संस्थेकडून कोणत्याही विषयातील पूर्णवेळ एमबीए/दोन वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा. शिवाय, उमेदवाराला व्यवसाय विकास/ मार्केटिंगचा एकूण १२ वर्षांच्या अनुभव असणे आवश्यक आहे.

  • प्रोजेक्ट मॅनेजर (सिव्हिल)

या प्रवर्गासाठी तब्बल 15 पदे उपलब्ध आहेत. ही वेतनश्रेणी 60,000 ते 1,80,000 रुपयांपर्यंत असू शकते. अर्जदार शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून 60 टक्के एकूण गुणांसह ही सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवीप्राप्त असावा. शिवाय, उमेदवाराला पीएमसी/ ईपीसी/ रिअल इस्टेट/ इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रातील एकूण सहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • उमेदवार 9 मे 2022 ते 8 जून 2022 या कालावधीत अधिकृत संकेतस्थळाद्वारे वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

दरम्यान महात्मा गांधी मिशन विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठीच्या या भरती आहेत. बीई/ बी.टेक & एम.ई / एम.टेक आणि पीएचडी असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. नोकरीचं ठिकाण औरंगाबाद आहे. 30 मे 2022 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. अर्ज करताना नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावं. अर्जात दिलेली आवश्यक कागदपत्रं प्रमाणपत्रं अपलोड करावीत. अधिक माहितीसाठी ही बातमी वाचा.