
Sarkari Naukri In Maharashtra: महाराष्ट्र शासनासोबत नोकरी करण्याची चांगली संधी राज्यातील महिलांना मिळणार आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मोठी भरती करण्यात येत आहे. ही भरतीप्रक्रिया 14 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. अंगणवाडी सेविका 5639 तर मदतनीस 13243 अशी एकूण 18 हजार 882 पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. भरतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाच्या गृहविभागात यापूर्वी मोठी भरती झाली होती. आता महिला व बालविकास विभागात भरती होत आहे.
महिला व बालविकास विभागात 18 हजार 882 पदे पदांची भरती होणार आहे. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती होणार आहे. या भरतीच्या अनुषंगाने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. त्यांनी ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.
महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार !
महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली.महाराष्ट्र शासनाने ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा… pic.twitter.com/c56sVSdKap
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 13, 2025
आदिती तटकरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका व 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे. तसेच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्यातील 553 बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एक लाख 10 हजार 591 अंगणवाडी केंद्रे आहेत. 5639 अंगणवाडी सेविका आणि 13243 अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे होती. ती आता भरली जात आहे. महिला बचत गटांनी एकत्रितरित्या पोषण आहाराकरिता आदर्श कम्युनिटी किचन करावे, यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.