धक्कादायक ! प्रेम, लग्न, परीक्षेचं कारण, देशात दोन वर्षात तब्बल 24,568 मुलामुलींची आत्महत्या, महाराष्ट्राचा आकडा मोठा

| Updated on: Aug 02, 2021 | 6:49 PM

नुकत्याच समोर आलेल्या नव्या आकडेवाडीनुसार 2017 ते 2019 या दोन वर्षात 14 ते 18 वर्षांमधील अल्पवयीन मुलामुलींच्या आत्महत्येची संख्या जास्त आहे.

धक्कादायक ! प्रेम, लग्न, परीक्षेचं कारण, देशात दोन वर्षात तब्बल 24,568 मुलामुलींची आत्महत्या, महाराष्ट्राचा आकडा मोठा
लग्नानंतर प्रेमी जोडप्याची विष प्राशन करुन आत्महत्या
Follow us on

मुंबई : देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे आजच्या तरुण पिढीतील बरेचजण नैराश्यात जावून स्वत:ला संपवून घेण्याचा टोकाचा निर्णय घेताना दिसत आहेत. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी हे हिताचं नाही. याशिवाय या तरुणांच्या कुटुंबियांसाठी देखील ते योग्य नाही. त्यामुळे आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाचं कसं होईल? याचाही विचार तरुणांनी करायला हवा. पण आत्महत्या करणाऱ्यांमध्ये फक्त तरुणच नाही तर अल्पवयीन मुलामुलींची संख्या देखील मोठी आहे.

नुकत्याच समोर आलेल्या नव्या आकडेवाडीनुसार 2017 ते 2019 या दोन वर्षात 14 ते 18 वर्षांमधील अल्पवयीन मुलामुलींच्या आत्महत्येची संख्यादेखील जास्त आहे. या दोन वर्षात तब्बल 24 हजार 568 मुलामुलींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे.

कोणत्या वर्षी नेमक्या किती आत्महत्या ?

याबाबत राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरो म्हणजेच एनसीआरबीने संसदेत डेटा प्रस्तूत केला आहे. याच रिपोर्टमधून समाजाची भयावह स्थिती उघड झाली आहे. या रिपोर्टनुसार 2017 ते 2019 या काळात आत्महत्येतून 14 ते 18 वयोगटातील 13,325 मुलींनी आत्महत्या केली आहे. तर मुलांची संख्या ही तब्बल 24,588 इतकी आहे.

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार 2017 मध्ये 8029 मुलामुलींनी आत्महत्या केली होती. तर 2018 मध्ये 8162 मुलामुलींनी आत्महत्या केली. तर 2019 मध्ये हीच संख्या 8333 वर पोहोचली.

महाराष्ट्रातील आत्महत्येचाही आकडा मोठा

विशेष म्हणजे मध्यप्रदेशात 2017 ते 2019 या दोन वर्षात 14 ते 18 वर्षांमधील अल्पवयीन मुलामुलींनी सर्वाधिक आत्महत्येची नोंद झाली आहे. मध्यप्रदेशात या दोन वर्षात तब्बल 3115 मुलामुलींनी आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये 2802 मुलामुलींनी आत्महत्या केली. तर महाराष्ट्रात 2527 आणि तामिळनाडूत 2035 मुलामुलींनी आत्महत्या केली होती.

आत्महत्येमागील नेमके कारण काय?

अल्पवयीन मुलांनी आत्महत्या करण्यामागील अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे परीक्षा. काही मुलामुलींनी परीक्षेची जास्त चिंता केली. आपल्याला किती गुण मिळतील याचा विचार केला. त्यातूनच नैराश्यात जावून तब्बल 4046 मुलामुलींनी आत्महत्या केली. काही अल्पवयीन मुलांनी प्रेम प्रकरण किंवा लग्नाच्या विचारातूनही आत्महत्या केली. काही मुलं उदास, नैराश्यात किंवा रागाच्या भरात आत्महत्येचा निर्णय घेतात. त्यांना त्याबाबत फारशी माहिती देखील नसते. किंवा ते त्याबाबत जास्त विचार करत नाही. त्यामुळे शालेय शिक्षणात मानसिक स्वास्थाशी संबंधित विषय असणं आवश्यक आहे, असं काही तज्ज्ञ म्हणतात.

हेही वाचा :

दारुड्या काकाचा सात वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्थानिकांकडून चोप

मुलींच्या नावाने सेक्शुअल चॅट, नंतर ब्लॅकमेलिंक करत लाखोंची मागणी, अशा नराधमांपासून सावध राहा