दारुड्या काकाचा सात वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्थानिकांकडून चोप

आरोपीने केलेल्या कृत्याची माहिती समजताच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे काही जणांनी आरोपीला मारहाण केली

दारुड्या काकाचा सात वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्थानिकांकडून चोप
नागपुरात काकाकडून पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 3:40 PM

नागपूर : गतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना दारुड्या काकानेच आपल्या सात वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नागपूर शहराच्या सीमेवर असलेल्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

आरोपीने केलेल्या कृत्याची माहिती समजताच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे काही जणांनी आरोपीला मारहाण केली, मात्र आरोपी दारुच्या नशेत असल्याने स्थानिकांनी या संदर्भात वाडी पोलिसांना सूचना देऊन आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

नेहमीच दारुच्या नशेत महिलांची छेड

पोलिसांनी आरोपी काकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपी अनिल या परिसरात नेहमीच दारुच्या नशेत महिलांना छेडून असे कृत्य करत असल्याचा दावा परिसरातील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्याची विनंती पोलिसांना केली जात आहे.

गतिमंद तरुणीवर चौघांचा गँगरेप

महाराष्ट्राच्या उपराजधानीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच समोर आली होती. काही नराधमांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आणि तरुणी गतिमंद असल्याचं हेरत तिला मोमीनपुरा भागातील टिमकी परिसरात एका खोलीत नेलं. त्या ठिकाणी चार जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार करुन त्यानंतर तिला ऑटोने मेयो रुग्णालय परिसरातील मेट्रो ब्रिजजवळ सोडलं. आरोपी त्यानंतर पळून गेले. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या इतर दोन संशयितांनी तिच्यावर ऑटो रिक्षामध्ये अत्याचार केला आणि ते पण पळून गेले.

पीडित मुलगी त्याच ठिकाणी पडून असल्याचं बघून जवळच असलेल्या रेल्वे पोलिसांना याची माहिती काही नागरिकांनी दिली. रेल्वे पोलिसांनी तिला विचारपूस करत चाइल्डला दिली त्यांनी मुलीला आपल्या सोबत घेऊन गेले आणि विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने माहिती दिली. चाइल्ड लाईनने रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यांनी चार आरोपींचा शोध घेत ताब्यात घेतलं.

संबंधित बातम्या :

उपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुलीचं वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी लग्न, गर्भधारणा झाल्यानंतर अखेर डॉक्टरांना समजलं, अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार

(Nagpur Uncle attempts to assault minor girl niece molestation)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.